घरात लावा ‘या’ पक्ष्यांचे फोटो, घरात सुख-समृद्धी येईल

Published:
वास्तुशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट पक्ष्यांचे फोटो लावल्याने वास्तूदोष दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मोर आणि नीलकंठ यांसारख्या पक्ष्यांचे फोटो घरात लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
घरात लावा ‘या’ पक्ष्यांचे फोटो, घरात सुख-समृद्धी येईल

वास्तूशास्त्रात, आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीला महत्त्व आहे.  मग ती घराची दिशा असो, फर्निचरची जागा असो किंवा भिंतीवरील चित्रे असोत. बऱ्याचदा आपण घर सजवण्यासाठी चित्रे लावतो, पण आपल्याला माहीत नसते की यातील काही चित्रे केवळ सौंदर्य वाढवतातच असे नाही तर सकारात्मक ऊर्जादेखील प्रसारित करतात. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रातील पक्ष्याच्या चित्राशी संबंधित उपायांबद्दल सांगत आहोत. ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

या पक्ष्यांचे फोटो घरात लावू नये

घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि वास्तू दोष दूर करण्यासाठी काही पक्ष्यांचे चित्र लावण्याची शिफारस केली जाते. पण काही पक्ष्यांचे चित्र घरात लावल्यास नकारात्मक ऊर्जा येऊ शकते.

जंगली पक्षी
वास्तुशास्त्रानुसार, काही जंगली पक्षी आणि प्राणी यांचे फोटो घरात लावणे शुभ मानले जात नाही. गिधाड, घुबड, कावळा, वटवाघुळ इत्यादी या पक्ष्यांचे फोटो लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि कुटुंबावर वाईट परिणाम होऊ शकतो.

घरात या पक्ष्यांचे फोटो लावा

मोर

घरात मोर या पक्ष्याचा फोटो लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे म्हटले जाते. मोर हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे मोर किंवा मोरपंखचे चित्र घरात लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात. मोराचे चित्र घरात सुख आणि शांती टिकवून ठेवते. मोराचे चित्र घरात लावल्याने कर्जापासून मुक्तता मिळते. मोराचे चित्र घरात लावल्याने लक्ष्मीचा वास येतो. मोराचे चित्र घरात योग्य ठिकाणी लावावे, जसे की मुख्य दरवाजाजवळ किंवा हॉलमध्ये.

नीलकंठ

घरात नीलकंठ पक्ष्याची प्रतिमा लावल्याने वास्तुदोष दूर होतो, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सुख-समृद्धी येते. नीलकंठ हे माता दुर्गेचे प्रतीक आहे, त्यामुळे नीलकंठचे चित्र घरात लावल्याने सुख-शांती टिकून राहते. नीलकंठ पक्षी आणि मोराची प्रतिमा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा पूर्व दिशेकडे लावल्यास अधिक शुभ मानले जाते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews