Marathi News

Aja Ekadashi 2025: अजा एकादशीला चुकूनही या वस्तू दान करू नका; काय कराल दान? ही आहे यादी!

Written by:Smita Gangurde
Published:
अजा एकादशीला कोणत्या वस्तूंचा दान करणं शूभ आणि कोणत्या वस्तू दान करणं अशुभ मानलं जातं, हे जाणून घेऊया.
Aja Ekadashi 2025: अजा एकादशीला चुकूनही या वस्तू दान करू नका; काय कराल दान? ही आहे यादी!

हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा-अर्चना करणे आणि उपवास करण्याचं विशेष महत्त्व आहे. अजा एकादशीचा उपवास केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो. या दिवशी दानाचं खास महत्त्व असतं. मात्र शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या दान करणं अशुभ मानलं जातं. तर काही वस्तू दान केल्याने प्रभूची विशेष कृपा राहते. अजा एकादशीला कोणत्या वस्तूंचा दान करणं शूभ आणि कोणत्या वस्तू दान करणं अशुभ मानलं जातं, हे जाणून घेऊया.

अजा एकादशी २०२५ चा शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद कृष्ण पक्षाची एकादशी तिथी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:२२ वाजता सुरू झाली आहे. तर, या तिथीचा समापन १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:२२ वाजता संपेल. म्हणून, उदय तिथी लक्षात ठेवून, १९ ऑगस्ट (मंगळवार) रोजी अजा एकादशीचे व्रत ठेवले जाईल. यासोबतच, अजा एकादशीचे पारण २० ऑगस्ट रोजी केले जाईल.

अजा एकादशी २०२५ शुभ योग

या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे. जो उपवास-पूजा आणि दानासाठी शुभ मानला जातो. शास्त्रानुसार, या शुभ योगांमध्ये भगवान विष्णूची पूजा-अर्जा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

अजा एकादशीला काय दान कराल

धान्य दान – गहू, तांदूळ, मूग डाळ यांसारखे धान्य दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. गाईला हिरवा चारा देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

वस्त्र दान – अजा एकादशीच्या दिवशी ब्राह्मण किंवा गरजूंना विशेषतः पांढरे, पिवळे किंवा नवीन कपडे दान करा.

तीळ आणि गूळ – धार्मिक श्रद्धेनुसार, अजा एकादशीच्या दिवशी या वस्तू दान केल्याने आरोग्य सुधारते आणि ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते.

सोने-चांदी किंवा धातूची भांडी – अजा एकादशीला, समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी सोने-चांदी आणि धातूची भांडी दान केली जातात.

शिजवलेले अन्न – भाद्रपदाच्या अजा एकादशीच्या दिवशी गरजू, ब्राह्मण किंवा संताला अन्न देणे खूप फलदायी आहे.

या वस्तू दान करू नका

काळं वस्त्र – यामुळे शनि दोष आणि अशुभ फळ मिळतं

तेल आणि दारू – अशुद्ध मानलं जातं. दानातून मिळणाऱ्या पुण्याऐवजी पाप लागतं

चाकू, कात्री किंवा लोखंडाचं सामान – विवाद

मीठ – दान केल्याने जीवनात अस्थितरता येते

चप्पल-शूज – अशुभ मानलं जातं.

 

 

 

 

Follow Us :GoogleNews