MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Angaraki sankashti chaturthi 2025 Wishes : बाप्पाची तुमच्यावर कायम कृपादृष्टी राहो, अंगारकी संकष्टीच्या शुभेच्छा!

Written by:Smita Gangurde
Published:
श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीही आल्यानं श्रद्धामय वातावरणात आणखी भर पडली आहे. यानिमित्ताने आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट यांना अंगारकीच्या मनोभावे शुभेच्छा द्या.
Angaraki sankashti chaturthi 2025 Wishes : बाप्पाची तुमच्यावर कायम कृपादृष्टी राहो, अंगारकी संकष्टीच्या शुभेच्छा!

यंदा श्रावणात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंगळवार आल्यानं अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आला आहे. व्रतवैकल्याचा महिना अशी ओळख असलेल्या श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीही आल्यानं श्रद्धामय वातावरणात आणखी भर पडली आहे. यानिमित्ताने आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट यांना अंगारकीच्या मनोभावे शुभेच्छा द्या.

अंगारकी संकष्टीनिमित्त आप्तजनांना द्या शुभेच्छा…

१ आजचा दिवस फक्त उपवासाचा नाही
तर मनाच्या शुद्धतेचा, भक्तीचा आहे
अंगारकी चतुर्थीचे हे पवित्र व्रत
आपण पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि नम्रतेने संपन्न करूया
गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो
जीवनात येणारी प्रत्येक अडचण सहजतेने पार होवो
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

२ अंगारकी म्हणजे विशेष चतुर्थी
आजचा दिवस गणपती बाप्पाच्या असीम कृपेचा दिवस
आज तुम्ही जे काही मनापासून मागाल
ते बाप्पा नक्की पूर्ण करतील
हे श्रद्धेने आणि निष्ठेने ठेवा
तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो
शुभ अंगारकी संकष्टी चतुर्थी 2025!

३ वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
सर्व गणेशभक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

४ प्रथम तुला वंदितो गणराया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया
तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया
सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

५ मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

बाप्पाची तुमच्यावर कायम कृपादृष्टी राहो हीच इच्छा…

६ गणराया सर्वांवर कृपा करतो
संकष्ट चतुर्थीचं महत्त्व सांगतो
भक्तीच्या मार्गावर चालू या
विघ्नांचा नाश करू या
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

७ विघ्नहर्त्याच्या नावाने सुरू होवो प्रत्येक दिवस
त्याच्या आशीर्वादाने मिटो काळोखाची छाया
संकष्ट चतुर्थीचा दिवस मंगल होवो
प्रत्येक क्षणात बाप्पाचं आशीर्वाद लाभो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

८ भक्तीचा दीप प्रज्वलित करू
बाप्पाच्या चरणी माथा झुकवू
गणरायाच्या आशीर्वादाने नवा उमंग मिळो
प्रत्येक दिवस समाधानाने फुलो
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

९ मनामध्ये श्रद्धा, मुखावर नाम
बाप्पा देतील सर्वांना शुभ परिणाम
संकष्ट चतुर्थी आली आहे खास
बाप्पाच्या आठवणींनी मनात दरवळला सुवास
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

१० आजच्या दिवशी विघ्नहर्त्या गणरायाचं पूजन करून तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील.
बाप्पा तुम्हाला सुख, शांती आणि समाधान देवो.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!