अंकज्योतिषनुसार, प्रत्येक अंकाची एक ऊर्जा आणि विशेषण असतात. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, त्या व्यक्तीचा स्वभाव, करिअर आणि भविष्याचा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. यासाठी जन्म तारखेतून मूल्यांक काढला जातो. जो १ ते ९ दरम्यान असतो आणि प्रत्येक अंकाचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारीखेला झाला असेल तर त्याचा मूल्यांक 4 असतो. या अंकाचा स्वामी ग्रह राहू आहे. राहू या लोकांच्या व्यक्तित्व, विचार, आणि आयुष्यात घेतलेल्या निर्णयांवर परिणाम करतो.
४ मूलांक असणारे लोक कसे असतात?
मूल्यांक ४ असणारे लोक मेहनती असतात. ही माणसं आपलं ध्येय मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. एकदा काम सुरू केल्यानंतर जीव तोडून मेहनत करतात आणि ते काम पूर्ण करतात.
हे ही वाचा
कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे, ते अचानक आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याची शक्यता जास्त असते. कधीकधी हे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी चुकीचा मार्ग देखील निवडू शकतात.
धाडसी निर्णय घेतात…
अंक ज्योतिषनुसार, मूलांक ४ असणारे जात परिणामांचा विचार न करता साहसी निर्णय घेतात. यांची वेगाने विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची ताकद यांना दुसऱ्यांपासून वेगळं करतात.
करिअरमध्ये यशाची संधी…
चार मूलांक असणारे लोक मीडिया, राजकारण, कायदासारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. त्यांची धोरणात्मक विचारसरणी आणि निर्णय घेण्याची क्षमता त्याला मोठ्या उंचीवर घेऊन जाते.
अंकशास्त्रानुसार, मूलांक ४ असलेले लोक धार्मिक आणि शिस्तप्रिय असतात. प्रामाणिकपणा आणि सचोटीमुळे त्यांना समाजात आदर मिळतो आणि ते प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
अंकशास्त्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मूलांक ४ असलेले लोक कोणत्याही संकोचाशिवाय त्यांचे विचार व्यक्त करतात. तसेच, ते इतरांना मदत करण्यात पुढे असतात, ज्यामुळे त्यांची प्रतिमा विश्वासार्ह आणि मजबूत बनते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)