बुधवारचा दिवस गणेशासाठी समर्पित असतो. बुद्धी, वाणी, व्यापार आदीच्या वृद्धीसाठी आशीर्वाद हवा असेल तर बुधवारच्या दिवशी गणेशाची पूजा-अर्चा करायला हवी. यासोबतच काही मंत्रांचा जप करून बुध ग्रहाला मजबूत करण्याचा उपाय केला जातो. बुधवारच्या दिवशी असे काही उपाय ज्यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतील.
दांम्पत्य जीवनात सुख मिळविण्याचा उपाय…
वैवाहिक जीवनात आनंद नसेल तर यासाठी बुधवारी एक सोपा उपाय केला जाऊ शकतो. यासाठी मूठभर मसूरची डाळ आपला पती किंवा पत्नीच्या हाताने सात वेळा स्पर्श करून घ्यावा. यानंतर मसूरची डाळ स्वच्छ वाहत्या पाण्यात सोडा. याचा चांगला प्रभाव होईल.
सर्व कार्यांसाठी उपाय…
बुधवारच्या दिवशी शुभ फळ मिळविण्यासाठी आणि सर्व कार्य पूर्ण करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. सकाळी आंघोळ आदी केल्यानंतर शमीच्या झाडाची पूजा करावी आणि त्या शमीच्या झाडाला कधीही कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नये.
घरात गणेशाची पांढरी प्रतिमा स्थापित करा…
घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं तुम्हाला वाटत असेल किंवा आपलं काम नीट होत नसल्याचा अनुभव येत असेल तर बुधवारी एक चांगला उपाय आहे. बुधवारी घरात गणेशाच्या पांढऱ्या प्रतिमेची स्थापना करा आणि विधीवत पूजा करा. ही प्रतिमा लहान असावी. घरातील कानाकोपऱ्यातून नकारात्मक निघून जाईल.
दु:ख दूर करण्याचे उपाय…
आयुष्यात सातत्याने वाईट गोष्टी घडत असतील, काही चांगलं होत नसल तर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करा. वेळ असेल तर झाडाजवळ बसून ढोलकी किंवा मृदंग वाजवा. बाप्पाशी संबंधित संगीत ऐका.
बुध ग्रहाच्या मंत्राचा जप…
जर तुम्हाला तुमचे संभाषण कौशल्य वाढवायचे असेल. आपल्या बोलण्यातून लोकांचा विश्वास मिळवायचा असेल तर सकाळी आंघोळ केल्यानंतर बुध ग्रहाच्या मंत्राचा ११ वेळा जप करा. तो मंत्र आहे- ओम ब्रम ब्रम ब्रम सह बुधाय नमः.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)





