Diwali 2025 : दिवाळीच्या खास माहोलात घरच्या घरी बनवा स्वादिष्ट गोड काजू कतली रेसिपी!

Published:
दिवाळी हा सण फक्त प्रकाशाचा नाही तर गोड पदार्थांचाही आहे... सणाच्या रंगात रंगून जाताना घरी गोड पदार्थांची मेजवानी बनवायला विसरू नका. आज ही रेसिपी घरी ट्राय करा आणि सणाचा गोडवा वाढवा...
Diwali 2025 : दिवाळीच्या खास माहोलात घरच्या घरी बनवा स्वादिष्ट गोड काजू कतली  रेसिपी!

लवकरच दिवाळी येतेय.. त्या निमित्ताने अनेक घरात साफसफाईला सुरूवात झालीय. तर काही ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि मिठाई बनवायचाही तयारी झालीय. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा आपल्याला मिठाईचा सुगंध आणि गोडवा जाणवू लागतो. आपल्यापैकी बहुतेक लोकांना काजूची बर्फी अर्थात काजू कत्री आवडते. दिवाळीसारख्या उत्सवाच्या दिवसांत कुठल्याही घरात काजू बर्फी सहज मिळतात. ही लोकप्रिय मिठाई आपण आपल्या घरी सहजपणे बनवू शकता….

साहित्य

  • 1/2 कप काजू
  • 1/2 कप दूध
  • 1 1/2 चमचे तूप
  • 1 कप साखर
  • 4 इंच सिल्वर वर्क
  • 1 चमचा हिरवी वेलची पावडर

कृती

  • प्रथम काजू आणि दुधाची एकत्र करून त्यांची बारीक पेस्ट बनवा.
  • यानंतर या पेस्टमध्ये साखर घालून मंद आचेवर शिजवा.
  • साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळा.
  • मिश्रण मध्यम आचेवर सतत ढवळत राहा आणि मिश्रण पिठासारखे दिसू लगून भांड्याची कडा सोडू लागले की त्यात वेलची पावडर मिसळून गॅसची आच बंद करा.
  • एका ताटाला अथवा तत्सम भांड्याला तूप लावून त्या पात्रात हे मिश्रण काढून घ्या. व्यवस्थित पसरून, थंड होण्यासाठी ठेवून द्या.
  • नीट सेट झाल्यावर त्यावर सजावटीसाठी चांदीचा वर्ख लावून त्याच्या वड्या कापून घ्या आणि खाण्यास सर्व्ह करा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews