Marathi News

Astro Tips : पगार जमा झाल्याचा मेसेज येताच सर्वप्रथम ‘हे’ काम करा; कधीच भासणार नाही पैशांची कमतरता..

Published:
पगार होण्याचा दिवस हा आनंदाचा आणि समाधानाचा असावा. ज्योतिषशास्त्र आणि भारतीय परंपरेनुसार, पगाराच्या दिवशी सकारात्मक राहणे हे केवळ मानसिक शांततेसाठीच नाही, तर आर्थिक स्थैर्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
Astro Tips : पगार जमा झाल्याचा मेसेज येताच सर्वप्रथम ‘हे’ काम करा; कधीच भासणार नाही पैशांची कमतरता..

पगार जमा झाल्याचा मेसेज आल्यावर ज्योतिषशास्त्र आणि आर्थिक नियोजनानुसार काही महत्त्वाच्या गोष्टी करणे फायदेशीर ठरते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

कृतज्ञता व्यक्त करणे

पगार जमा झाल्याचा मेसेज येताच सर्वप्रथम मिळालेल्या धनाचा आदर करून कृतज्ञता व्यक्त करावी. यामुळे लक्ष्मी स्थिर राहते. पगार जमा झाल्याचा मेसेज पाहताच मनोमन लक्ष्मी मातेचे आभार मानावेत कृतज्ञतेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.  “माझ्या श्रमाचे फळ मला मिळाले आहे” ही भावना ठेवून आनंदी राहिल्याने भविष्यात अधिक चांगले यश मिळवण्याची प्रेरणा मिळते.

आई-वडिलांना काही भाग देणे

हाती आलेल्या धनाचा ओघ सुरू राहण्यासाठी पगारातील काही भाग सर्वप्रथम आई-वडिलांना किंवा घरातील वृद्ध व्यक्तींना द्यावा. पगाराचा काही अंश आई-वडिलांच्या हातात देऊन त्यांचा आशीर्वाद घेतल्यास घरात बरकत राहते असे मानले जाते.

घरातील देवासामोर ठेवा

पगार जमा झालेल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी देवासमोर दिवा लावून मिळालेल्या पगारातील काही भाग देवाच्या चरणी ठेवा.

हे टाळा

पगार जमा झाल्याच्या दिवशी कोणाशीही वाद घालणे, राग व्यक्त करणे किंवा नकारात्मक बोलणे टाळावे.  पैसा हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. पगाराच्या दिवशी राग किंवा चिडचिड केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे ‘लक्ष्मी चंचल’ होते आणि पैसा टिकत नाही. या दिवशी कुटुंब, मित्र किंवा सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळावे. आनंदी राहिल्याने कामाच्या ठिकाणी आणि घरात प्रसन्न वातावरण राहते, जे प्रगतीसाठी पूरक असते.

आर्थिक नियोजनाचा दृष्टिकोन

पगार येताच खर्च करण्यापूर्वी गुंतवणुकीची रक्कम बाजूला काढावी. यामुळे महिनाअखेर पैशांची चणचण भासत नाही. पगार मिळताच सर्व बिले आणि घरगुती खर्चाचे नियोजन आधी करावे. जर तुमच्यावर कर्ज असेल, तर पगार क्रेडिट होताच सर्वात आधी कर्जाचे हप्ते भरण्यास प्राधान्य द्यावे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews