झोपेत तोंडातून लाळ गळणे ही केवळ आरोग्याशी संबंधित समस्या नसून, ती कुंडलीतील सूर्य ग्रह कमकुवत असल्याचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती अशुभ किंवा निर्बळ असते, तेव्हा शरीरातील लाळ तयार होण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो आणि झोपेच्या स्थितीत लाळ बाहेर पडू लागते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
कमजोर सूर्य
कुंडलीत सूर्याची स्थिती बिघडल्यास किंवा सूर्य कमजोर झाल्यास लाळ गळण्याची समस्या उद्भवू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार झोपेत तोंडातून लाळ गळणे हे कुंडलीतील सूर्य ग्रह कमकुवत असल्याचे लक्षण मानले जाते. जेव्हा सूर्य ग्रह प्रतिकूल स्थितीत असतो, तेव्हा व्यक्तीला अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, याचा संबंध कमजोर चंद्र किंवा राहू-केतूच्या अशुभ प्रभावाशी असू शकतो. हे ग्रह मानसिक अस्वस्थता, चुकीच्या झोपण्याची दिशा किंवा अपचन यासारखी लक्षणे दर्शवतात, ज्यामुळे लाळ गळते. यावर योग्य उपाय करणे आवश्यक आहे.
कमकुवत सूर्य ग्रहाची लक्षणे
- कामात निर्णय घेताना भीती वाटणे किंवा स्वतःवर शंका असणे.
- वडिलांशी वारंवार वाद होणे किंवा त्यांचे प्रेम न मिळणे.
- वारंवार डोळ्यांचे विकार, हाडांची कमजोरी, हृदयविकार किंवा रक्तदाब वाढणे.
- समाजात योग्य मान-सन्मान न मिळणे आणि मेहनतीचे फळ न मिळणे.
- शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवणे आणि कामे वेळेवर पूर्ण न होणे.
कमकुवत सूर्य ग्रहासाठी उपाय
- दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशातून सूर्याला जल अर्पण करा. जल अर्पण करताना ‘ओम सूर्याय नमः’ मंत्राचा जप करावा.
- पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा वापर करावा. तांबे हा सूर्याचा धातू असल्याने लाळ गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
- दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावा आणि शक्य असल्यास रविवारी मीठ नसलेले अन्न ग्रहण करा.
- रविवारी गूळ, गहू किंवा लाल कपड्यांचे गरजू व्यक्तीला दान करावे.
- आपल्या वडिलांचा मान राखा आणि दररोज त्यांचे आशीर्वाद घ्या.
- उजव्या हाताच्या अनामिकेत तांब्याची अंगठी धारण करणे फायदेशीर मानले जाते.
- रात्रीचे जेवण लवकर करावे आणि सूर्याच्या प्रकाशात काही वेळ घालवावा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






