Marathi News

Datta Jayanti 2025 : दत्त जयंती विशेष! श्री गुरुदेव दत्तांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे

Published:
विष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयाची जयंती 4 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही दत्ताच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे
Datta Jayanti 2025 : दत्त जयंती विशेष! श्री गुरुदेव दत्तांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे

मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीगुरुदेव दत्तात्रयांची जयंती साजरी केली जाते. यादिवशी घरी बाळाचा जन्म झाला असेल तर त्यासाठी ठेवा अतिशय गोड नावं.

दत्तजयंती का साजरी केली जाते?

दत्तजयंती हा भगवान दत्तात्रेय यांच्या जन्माचा दिवस आहे, म्हणूनच तो साजरा केला जातो. दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप मानले जातात.  या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून सायंकाळी पूजा केली जाते. दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते आणि या निमित्ताने दत्तयाग, गुरुचरित्राचे पारायण आणि दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा पादुकांची पूजा केली जाते आणि सायंकाळी पाळणा हलवला जातो. 

मुलांची नावे

दात्विक – ज्याला भगवान दत्तात्रेयांचा आशिर्वाद
दत्तांश – भगवान दत्तात्रेयांचा अंश
दत्तेश – भगवान दत्तात्रेय
दात्वेंद्र – दैवी ज्ञानाचा राजा
वल्लभ – वल्लभ म्हणजे प्रिय व्यक्तीमत्त्व
अव्यान – दोषांपासून मुक्त असा तो
सुव्रत – सर्वात अनुकूल रुप धारण केलेला
श्रीश – समृद्धीचा स्वामी
ऋषिक – ज्ञानाने परिपूनर
माहिल – सौम्य आणि अतिशय विचारशील

आदवन – सूर्यासारखे तेज असलेले
आवर्तन- न पाहिलेल्या गतिशीलतेसह
अच्युतम – ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही
अदीप- प्रकाश
अधृत – ज्याला आधाराची गरज नाही, ज्याला इतरांचा आधार आहे
अद्वैत – सर्वात शक्तिशाली
अग्निज – जो अग्नीपासून जन्माला आला आहे
अजेय- जो पराभूत होऊ शकत नाही
अक्षर- अझर-अमर
अमिताश – सर्वव्यापी आणि पवित्र चिन्ह
अमोघ – जो सर्व काही एका उद्देशाने करतो
अमृताय – जो कधीही मरू शकत नाही
अनघ – ज्याने कोणतेही पाप केले नाही
आनंद – आनंद
अनंताजित – जो नेहमी विजयी असतो
अनंत – अंत नसलेला
अनय- ज्याचा मालक नाही
अव्यय – नेहमी एक उरतो
अनिमिष – जो सर्व काही जाणतो
अनिरुद्ध- अनिर्बंध
अन्वित – जो अंतर भरतो
अर्णव – समुद्रासारखा विशाल
अनुत्तम – सर्वोत्तम देव
अव्यान – जो दोषांपासून मुक्त आहे
भावेश- जग चालवणारा
दक्ष – सक्षम

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews