दिवाळी सण म्हणजे आनंद, उत्साहाचा, जल्लोषाचा. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेचजण दिवाळी उत्साहात साजरी करतात. दिवाळी या सणानिमित्त फटाके फोडणे, नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत मजा करणे, विविध मिठाई आणि पदार्थांचा आस्वाद घेणे, गोड धोड खाणे हे सुरुच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण आपल्या प्रिजनांच्या भेटीगाठी घेतो. यंदाच्या दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही थंड पेय बनवू शकता. थंड पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतील….
ऑरेंज मॉकटेल
साहित्य
- २ कप ताज्या संत्र्याचा रस
- १/२ कप लिंबाचा रस
- १/४ कप साखर किंवा चवीनुसार मध
- थंड पाणी
- बर्फाचे तुकडे
- संत्र्याची फोड आणि पुदिन्याची पाने
कृती
- एका मोठ्या भांड्यात संत्र्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करा.
- त्यात साखर किंवा मध घालून ते विरघळेपर्यंत चांगले मिसळा.
- आता त्यात थंड पाणी घालून पुन्हा एकदा ढवळा.
- ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि तयार केलेले मॉकटेल त्यात ओता.
- सजावटीसाठी संत्र्याची फोड आणि पुदिन्याची पाने वापरा.
- थंडगार सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..