यंदा २० ऑक्टोबरला दिवाळी असून सर्वच जण या गोड सणाची आतुरतेने वाट बघत आहेत. खरं तर दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे याचे महत्वही तितकच मोठं आहे. दिवाळीच्या दिवसांत प्रत्येकाच्या घरात पाहुण्यांचे आगमन होत असते. अशावेळी आपले घर सुंदर दिसावे, यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू असते. दिवाळीच्या निमिताने आपण सर्वच आपलं घर आकर्षक पद्धतीने सजवत असतो. मात्र कमी बजेट मुळे अनेकांना इच्छा असूनही चांगल्या प्रकरे घर सजवता येत नाही. परंतु आता चिंता करू नका, आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामाध्यमातून तुम्ही कमी बजेट मध्ये आकर्षक पद्धतीने घराची सजावट करू शकाल…
रांगोळी
सण असला कि आपण घरासमोर रांगोळी काढतो. कारण रांगोळी घराचे सौंदर्य वाढवते. घर सजावटी साठी रांगोळी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. दिवाळीनिमित्त तुम्ही तुमच्या घरासमोर, फरशीवर किंवा अंगणात सुंदर अशी रांगोळी काढू शकता. रांगोळी काढणे हे घराची शोभा वाढवणारे आणि सणासुदीला केले जाणारे एक पारंपरिक काम आहे, ज्यामुळे घर सुंदर दिसते. रांगोळी घराची शोभा वाढवते आणि सणासुदीला एक खास वातावरण निर्माण करते. दिवाळीसारख्या सणांमध्ये घराच्या दारात रांगोळी काढणे ही एक सुंदर आणि महत्त्वाची परंपरा आहे.
फर्निचर
नवीन फर्निचर खरेदी करण्याऐवजी जुने फर्निचर पॉलिश करा किंवा रंगवा. नवीन आणि आकर्षक कुशन कव्हर, कमी खर्चात तुमच्या घराचा लूक पूर्णपणे बदलू शकते.
लाईट्स
दिवाळी आधीच सगळ्या दुकानांबाहेर लाईटिंग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दुकानदार करत असतात. लाईट्सचा वापर करून आपणही आपल्या घराची बाल्कनी अथवा दरवाजे सजवू शकता. ही रंगीबेरंगी लाईटिंग तुमच्या घराच्या सौंदर्याला नक्कीच चार चांद लावेल.
फुलदाणी
फुलदाणी हा घराची शोभा वाढवणारा घटक आहे. दिवाळीच्या दिवशी घर सजवण्यासाठी आपण क्रिस्टल फ्लॉवर वासमध्ये काही सुंदर, सुवासिक फुले ठेवू शकता. घराच्या लिव्हिंग रूममध्ये आणि हॉलमध्ये आपण फ्लॉवर वास ठेवू शकता. फुले केवळ घराची शोभा वाढवत नाहीत तर, बघणाऱ्याच्या मनाला आनंददेखील प्रदान करतात.
फुले आणि तोरण
घराचे दरवाजे आणि खिडक्या सजवण्यासाठी तुम्ही फुले आणि तोरण वापरू शकता. घराच्या मुख्य गेटसाठी आणि बाकीच्या खोल्यांसाठी तुम्ही बाजारातून वेगवेगळ्या डिझाइनची तोरणं खरेदी करू शकता. दिवाळीच्या दिवशी मुख्य गेटवर तोरण लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. अनेकजण घरोघरी आंब्याच्या पानांपासून तोरण बनवतात. ते लावल्याने घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला अतिशय सुंदर आणि पारंपारिक स्वरूप प्राप्त होते. फुलांच्या माळा आणि फुलांच्या पाकळ्या वापरून घराला ताजेतवाने आणि सुंदर लुक द्या. रंगीबेरंगी फुलं ही कोणत्याही सणाची शोभा अधिक वाढवतात. तुम्हाला देखील तुमचं घर फुलांनी सजवायचं असेल तर तुम्ही झेंडू आणि गुलाबाच्या फुलांचा वापर करू शकता.
आकर्षक दिवे
दिवाळीत घर दिव्यांनी सजवलं जातं. अशा वेळी तुम्ही डेकोरेटिव्ह पणत्यांनी तुमचं घर सजवू शकता. यासाठी तुम्ही घरीच पणत्यांना आकर्षक रंगांनी आणि डिझाईनने सजवू शकता. सजावटीसाठी अनेक प्रकारचे आकर्षक दिवे बाजारात उपलब्ध आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





