हिंदू परंपरेनुसार दिवाळीचा पाच दिवसांचा उत्सव कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीपासून सुरू होतो. या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशीदेखील म्हणतात. या विशेष दिवशी आई लक्ष्मी, भगवान धन्वंतरि आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धनतेरसच्या दिवशी विशेषतः भगवान धन्वंतरी आणि धनदेवतेची पूजा केली जाते. दिवाळीच्या विशेष प्रसंगी घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहावी म्हणून लक्ष्मीमातेला नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी प्रसादासाठी तुम्ही देखील खोबऱ्याचे लाडू बनवू शकता पाहा सोपी रेसिपी…
साहित्य
- किसलेले खोबरे २ वाटी
- साखर १ वाटी
- दूध २ वाटी
- शुद्ध तूप ३ चमचे
- वेलची पावडर अर्धा चमचा
- सुका मेवा आवडीनुसार बारिक पावडर करा
कृती
- एका कढईत तूप गरम करा आणि त्यात किसलेले खोबरे घालून मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
- आता त्यात साखर आणि दूध घाला.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. साखर पूर्णपणे विरघळेल आणि मिश्रण कढईला चिकटणार नाही हे बघा.
- गॅस बंद करा आणि त्यात वेलची पावडर, सुका मेवा घालून चांगले मिसळा.
- मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे छोटे लाडू वळा.
- लाडू थंड झाल्यावर प्रसादासाठी तयार आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






