Marathi News

Dhantrayodashi 2025 : दिवाळीत नैवेद्यासाठी बनवा रव्याचा शिरा, पाहा सोपी रेसिपी…

Published:
Dhantrayodashi 2025 : दिवाळीत नैवेद्यासाठी बनवा रव्याचा शिरा, पाहा सोपी रेसिपी…

हिंदू परंपरेनुसार दिवाळीचा पाच दिवसांचा उत्सव कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीपासून सुरू होतो. या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशीदेखील म्हणतात. धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी लोक आधीच तयारी करत असतात. या विशेष दिवशी आई लक्ष्मी, भगवान धन्वंतरि आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धनतेरसच्या दिवशी विशेषतः भगवान धन्वंतरी आणि धनदेवतेची पूजा केली जाते. दिवाळीच्या विशेष प्रसंगी घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहावी म्हणून लक्ष्मीमातेला नैवेद्य अर्पण केला जातो. या खास दिवशी गोड पदार्थ तयार केले जातात. या गोड पदार्थांना नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी प्रसादासाठी तुम्ही देखील रव्याचा शिरा बनवू शकता…

साहित्य

  • रवा – १ कप
  • तूप – १/२ कप
  • साखर – ३/४ कप
  • दूध – १ कप
  • केशर – दुधात भिजवलेले
  • वेलची पावडर
  • काजू, बदाम, पिस्ता
  • मनुका

कृती

  • सर्वात आधी कढईत तूप गरम करा आणि त्यात रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. भाजलेला रवा बाजूला काढून ठेवा
  • एका भांड्यात दूध आणि पाणी एकत्र गरम करा.
  • उकळत्या दूध आणि पाण्यात भाजलेला रवा हळूहळू घालत राहा आणि सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
  • रवा शिजल्यानंतर साखर आणि भिजवलेले केशर घाला. साखर वितळेपर्यंत ढवळा. तुपात परतलेले काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका घाला. वेलची पावडर मिसळा.
  • शिरा घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि वरून तूप किंवा आवडीनुसार ड्राय फ्रुट्स घालून नैवेद्य म्हणून अर्पण करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews