Marathi News

Diwali 2025 : लाडक्या भावाला भाऊबीजनिमित्त घरच्या घरी बनवा टेस्टी ड्रायफ्रुट्स बर्फी, वाचा रेसिपी…

Published:
दिवाळीमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना मिठाईमध्ये काय द्यावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही ड्रायफ्रुट्स बर्फी बनवू शकता. ड्रायफ्रुट्स बर्फी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
Diwali 2025 : लाडक्या भावाला भाऊबीजनिमित्त घरच्या घरी बनवा टेस्टी ड्रायफ्रुट्स बर्फी, वाचा रेसिपी…

भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान छान गोड पदार्थ बनवून द्या. आज आम्ही तुम्हाला ड्रायफ्रुट्स बर्फी कशी बनवायची ह्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…

साहित्य

  • १ लिटर दूध
  • १/४ कप खवा
  • १/२ कप साखर
  • २ चमचे तुपाचा वापर
  • चिरलेला सुका मेवा (बदाम, काजू, अक्रोड, अंजीर)
  • केशर (दुधात भिजवलेले) 

कृती

  • एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा आणि त्याला घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
  • दुधाला घट्टपणा आल्यावर त्यात खवा आणि साखर घाला.
  • मिश्रण व्यवस्थित एकत्र झाल्यावर त्यात चिरलेला सुका मेवा आणि केशर घाला.
  • मिश्रण एका तूप लावलेल्या ताटलीत पसरवा आणि थंड होऊ द्या.
  • थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात कापून घ्या आणि दिवाळीत पाहुण्यांना सर्व्ह करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews