Diwali 2025 : नमकीन मठरी बनवण्याची झटपट रेसिपी…

Published:
संध्याकाळच्या चहा किंवा कॉफीसोबत मस्त काहीतरी खमंग खाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. तर आपण कुरकुरीत मठरी चहासोबत खाऊ शकता.
Diwali 2025 : नमकीन मठरी बनवण्याची झटपट रेसिपी…

दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळी म्हंटली की फराळ हा आलाच; घरात करंजी, शंकरपाळी, लाडू, चिवडा यांसारखे गोड-तिखट पदार्थ बनवले जातात, दिवाळीत सतत गोड, गोड खाऊन कंटाळा आला की काहीतरी चटपटीत खावंस वाटतं. अशावेळी तुम्ही नमकीन मठरी खाऊन फराळाचा आनंद घेऊ शकता…

साहित्य

मैदा
रवा
तूप
कसुरी मेथी
ओवा
काळी मिरी पावडर
मीठ
पाणी
तेल

कृती

  • एका भांड्यात मैदा, रवा आणि तूप घालून चांगले मिसळून घ्यावे लागेल. त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, कसुरी मेथी आणि ओवा घालून मिक्स करा. मठरी कुरकुरीत करण्यासाठी त्यात तुपाचे मोहन घाला.
  • पीठ व्यवस्थित मिक्स करुन त्यात मळण्यासाठी थोडे थोडे पाणी घालून कणिक तयार करा.
  • पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या आणि १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा.
  • नंतर पिठाचे छोटे गोळे करुन लहान पुऱ्या बनवा. 
  • पुऱ्यांना काटे चमच्याने टोचे मारा जेणेकरून ती तळताना फुगणार नाही.
  • एका कढईत तेल गरम करून घ्या आणि मंद आचेवर पुऱ्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
  • तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढा आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा.

टिप्स

  • मठरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ घट्ट मळावे.
  • तळताना गॅसची आच मंद ठेवावी, जेणेकरून मठरी आतून कच्ची राहणार नाही. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews