Marathi News

Diwali 2025 : दिवाळीच्या खास माहोलात घरच्या घरी बनवा स्वादिष्ट गोड केशर बासुंदी रेसिपी!

Published:
दिवाळी हा सण फक्त प्रकाशाचा नाही तर गोड पदार्थांचाही आहे... सणाच्या रंगात रंगून जाताना घरी गोड पदार्थांची मेजवानी बनवायला विसरू नका. आज ही रेसिपी घरी ट्राय करा आणि सणाचा गोडवा वाढवा...
Diwali 2025 : दिवाळीच्या खास माहोलात घरच्या घरी बनवा स्वादिष्ट गोड केशर बासुंदी रेसिपी!

लवकरच दिवाळी येतेय.. त्या निमित्ताने अनेक घरात साफसफाईला सुरूवात झालीय. तर काही ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि मिठाई बनवायचाही तयारी झालीय. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा आपल्याला मिठाईचा सुगंध आणि गोडवा जाणवू लागतो. सणाच्या रंगात रंगून जाताना घरी गोड पदार्थांची मेजवानी बनवायला विसरू नका. केशर बासुंदीची रेसिपी घरी ट्राय करा आणि सणाचा गोडवा वाढवा…

साहित्य

  • फुल क्रीम दूध
  • साखर (आवडीनुसार)
  • केसर (थोड्या दुधात भिजवलेले)
  • वेलची पूड
  • बदाम आणि पिस्ता काप (सजावटीसाठी)
  • काजू (ऐच्छिक) 

कृती

  • केशर बासुंदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून घ्या.
  • दूध आटायला लागल्यावर बाजूने येणारी साय दुधात मिसळत राहा.
  • दूध अर्धे होईपर्यंत किंवा घट्टसर होईपर्यंत आटवा. या प्रक्रियेला साधारणपणे ३०-४० मिनिटे लागतील.
  • आता यात भिजवलेले केसर, साखर आणि वेलची पूड घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
  • काजू आणि बदाम घाला आणि आणखी ५ मिनिटे शिजवा जेणेकरून सर्व चव एकत्र येईल.
  • गॅस बंद करा आणि बासुंदी थंड होऊ द्या.
  • थंड झाल्यावर केशर आणि पिस्त्याच्या काप्याने सजवून सर्व्ह करा. 
  • काहींना बासुंदी गरम खायला आवडते तर काहींना बासुंदी थंड खायला आवडते.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली केशर बासुंदी.
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews