दिवाळी म्हटली की उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. हाच आनंद द्विगुणित होण्यासाठी आपण सणाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येण्याचे ठरवतो. पण पाहुण्यांना बोलावल्यावर जेवायला काय करायचे असा प्रश्न आपल्यासमोर असतो. झटपट होईल, सगळ्यांना आवडेल असे काहीतरी करायचे असेल तर म्हणूनच या दिवाळीत तुमच्याघरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी पनीर टिक्काचा बेत करा. जाणून घेऊयात रेसिपी…
साहित्य
- पनीर
- कांदा
- ढोबळी मिरची
- टोमॅटो
- दही
- आले-लसूण पेस्ट
- बेसन
- लिंबाचा रस
- तेल
- धने पावडर
- जिरे पावडर
- गरम मसाला
- काश्मिरी लाल मिरची पावडर
- हळद
- मीठ
- कसुरी मेथी
कृती
- एका मोठ्या भांड्यात दही घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट, बेसन, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळा.
-
आता या मिश्रणात पनीरचे तुकडे, कांदा, ढोबळी मिरची आणि टोमॅटोचे तुकडे घालून हळूवारपणे मिक्स करा. पनीर तुटू नये याची काळजी घ्या. हे मिश्रण कमीत कमी 30 मिनिटे मुरण्यासाठी ठेवा.
- एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि मॅरीनेट केलेले पनीर आणि भाज्या घालून मध्यम आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवा. भाज्यांचा कुरकुरीतपणा टिकवून ठेवा.
- तुम्ही तव्यावरही शिजवू शकता. तव्यावर तेल गरम करून पनीर आणि भाज्या घाला आणि सर्व बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.
- एका भांड्यात शिजवलेले पनीर आणि भाज्या घ्या. त्यात कसुरी मेथी चुरडून टाका आणि हलक्या हाताने मिसळा.
- पनीर टिक्का कोथिंबीर आणि लिंबाच्या फोडींनी सजवून गरमागरम सर्व्ह करा. तुम्ही हा पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा चपाती/नानसोबतही खाऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





