भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान छान गोड पदार्थ बनवून द्या. आज आम्ही तुम्हाला कलाकंद कशी बनवायची ह्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…

साहित्य

  • पनीर
  • दूध
  • काजू बदाम तुकडे
  • वेलची पावडर
  • साखर
  • गुलाबाच्या पाकळ्या

कृती

  • कलाकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीर घेऊन किसून घ्या. नंतर त्यात दूध घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रणाचा टोप गॅसवर ठेवून सतत चमच्याने ढवळत राहा.
  • दूध आणि पनीरची व्यवस्थित पेस्ट झाल्यानंतर हळूहळू मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल.
  • दूध आणि पनीरचे दाणेदार मिश्रण तयार झाल्याशिवाय कलाकंद व्यवस्थित तयार होणार नाही.
  • दाणेदार मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून सगळ्यात शेवटी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात केशरच्या काड्या टाकू शकता.
  • ताटाला तूप लावून त्यात दूध आणि पनीरचे घट्ट मिश्रण ओतून हाताने पसरवून घ्या. कलाकंद थंड झाल्यानंतर सुरीच्या साह्याने तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुकडे पाडा.
  • सजवण्यासाठी काजू बदामाचे तुकडे आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून सर्व्ह करा.