Diwali 2025 : दिवाळीला प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा संदेश…

Published:
दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि दिव्यांचा सण...त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो.
Diwali 2025 : दिवाळीला प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा संदेश…

दिवाळीपूर्वी, ‘छोटी दिवाळी’ हा सण साजरा केला जातो. हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. याला ‘नरक चतुर्दशी’ असेही म्हणतात. या दिवसाला ‘पहिली अंघोळ’ असंही म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान हनुमान आणि भगवान विष्णू यांच्या वामन स्वरुपाची पूजा केली जाते.  या सणाचा आनंद वाढवण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या विशेष शुभेच्छा…

छोटी दिवाळी 2025 

यंदा नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान 20 ऑक्टोबरला म्हणजेच आज आहे. यादिवशी पहाटे उठून उटण आणि सुंगधी तेल लावून स्नान करण्यात येतं. त्यानंतर फटाके फोडून फराळ केला जातो. यादिवशी मंदिरात जाण्याची परंपरा देखील आहे.

दिवाळी निमित्त खास शुभेच्छा संदेश..

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे!
चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो,
लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

दारी दिव्यांची आरास
अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास
आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

अभ्यंगस्नानाने झाली पहाट
दारी रांगोळीचा थाट
सण आला प्रकाशाचा
दिव्यांची केली रास
चिवडा, करंजी, चकली, फटाकेही खास
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमचे आयुष्य दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघो.
दररोज दिवाळीसारखा आनंद तुमच्या जीवनात येवो..
सुख, समृद्धी तुमच्या आयुष्यात राहो.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!