Marathi News

Diwali 2025 : चिवडा नरम होतो? ‘या’ टिप्स वापरा चिवडा संपेपर्यंत तसाच राहील कुरकुरीत…

Published:
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. हिंदू धर्मात दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे फराळ. दिवाळीच्या 15 दिवस आधीच फराळ बनवायला सुरुवात होते.
Diwali 2025 : चिवडा नरम होतो? ‘या’ टिप्स वापरा चिवडा संपेपर्यंत तसाच राहील कुरकुरीत…

दिवाळी काही दिवसांवर आली असताना गृहिणींची फराळ बनवण्याची लगबग सुरू होते. अनेक ठिकाणी हल्ली विकतचा फराळ मिळतो मात्र घरच्या फराळासारखी तशी चव बाजारातल्या फराळाला क्वचितच येते. चकली, लाडू बनवणं बऱ्याचजणांना अवघड वाटतं म्हणून अनेकजण फराळाचे हे पदार्थ बाहेरून आणतात पण हलका, फुलका चिवडा करायला सोपा आणि कमीत कमी वेळेत तयार होणारा असल्यामुळे अनेकजण घरीच हा चिवडा बनवतात. फराळ बनावल्यानंतर कधी कधी त्यातील चिवडा नरम पडतो. अशावेळी ऐन दिवाळीत फजिती होती. चिवडा दीर्घकाळ कुरकुरीत राहावा, यासाठी या काही टिप्स वापरून पाहाच…

कडक उन्हात ठेवावे

चिवडा बनवण्यापूर्वी पातळ पोहे १ ते २ तास कडक उन्हात ठेवून वाळवा. किंवा पोहे मंद आचेवर कोरडे भाजून घ्या. यामुळे त्यातील ओलावा निघून जातो आणि चिवडा जास्त दिवस कुरकुरीत रहातो.

चिमूटभर मीठ टाका

पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असाल तर जेव्हा आपण जेव्हा पोहे भाजून घेत असतो, तेव्हा चिमूटभर मीठ टाका. यामुळे पोह्यांचा आकार लहान होत नाही आणि पोहे जास्त वेळ कुरकुरीत राहतात.

सर्व साहित्य थंड होऊ द्या
चिवडा तयार करताना भाजलेले पदार्थ आणि तळलेले साहित्य पूर्णपणे थंड झाल्यावरच एकत्र करा. जर गरम असतानाच चिवडा एकत्र केला, तर तो लवकर नरम पडतो. चिवड्यात आपण जे जे साहित्य टाकतो, त्यात कढीपत्ता किंवा मिरची हे दोन घटक ओलसर असतात. मिरची आणि कढीपत्ता खुसखुशीत होईपर्यंत तळावा. जेणेकरून चिवड्यात त्याचा ओलसरपणा जाणार नाही.

हवाबंद डब्यात साठवा

चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर, त्याला हवाबंद डब्यात भरून ठेवावा. यामुळे तो जास्त काळ कुरकुरीत राहतो. गरम असताना डब्यात भरून ठेवल्यास त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो.

ओलावा टाळा

चिवड्यामध्ये ओलावा जाऊ नये याची काळजी घ्या. डब्यामध्ये हवा खेळती राहू नये, चिवड्याच्या डब्यात चुकूनही ओला चमचा घालू नका, कारण त्यामुळे लगेच चिवडा मऊ पडतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews