Diwali 2025 : दिवाळीला घरीच बनवा खमंग आणि खुसखुशीत पालक शेव

Published:
घरातील स्त्रियांची फराळाची तयारी सुरु झाली आहे. अनेक स्त्रिया आपल्या पारंपरिक पद्धतीने फराळ बनवतात. चला तर आज जाणून घेऊयात खुसखुशीत पालक शेव रेसिपी.
Diwali 2025 : दिवाळीला घरीच बनवा खमंग आणि खुसखुशीत पालक शेव

दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे, दिवाळी म्हंटलं पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे फराळ. फराळाशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. घराघरांमध्ये आता दिवाळीच्या फराळाची लगबग सुरु झाली आहे. या फराळामध्ये काही पदार्थ असे असतात की त्यात जर थोडंसं प्रमाण कमी-जास्त झालं, तर ते लगेच बिघडतात. त्यापैकीच एक म्हणजे शेव. अनेकदा शेव तळल्यानंतर ती काही वेळाने नरम पडते, पण आज आपण पाहणार आहोत अशी पालक शेव रेसिपी, जी नेहमीसारखी नरम न होता खुसखुशीत आणि खमंग राहील….

साहित्य

  • बेसन पीठ
  • पालकची पेस्ट
  • तिखट
  • हळद
  • हिंग
  • मीठ
  • तेल 

कृती

  • एका भांड्यात बेसन पीठ घ्या आणि त्यात पालकाची पेस्ट, तिखट, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा.
  • पिठाचे मिश्रण थोडे घट्टसर बनवा, जेणेकरून शेव जाडसर तयार होईल.
  • शेवगळणीत हे मिश्रण भरा आणि गरम तेलात शेवगाळणीने शेव सोडा.
  • दोन्ही बाजूंनी शेव सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या.
  • तळलेली शेव पेपर टॉवेलवर ठेवा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • या पद्धतीने तुम्ही कुरकुरीत आणि खमंग पालक शेव दिवाळीसाठी तयार करू शकता.