Diwali 2025 : दिवाळीला घरीच बनवा तोंडात विरघळणारे खुसखुशीत चिरोटे

Published:
आज आम्ही तुम्हाला नाजूक कळ्यांचे चिरोटे कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया चिरोटे बनवण्याची रेसिपी.
Diwali 2025 : दिवाळीला घरीच बनवा तोंडात विरघळणारे खुसखुशीत चिरोटे

दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सगळीकडे खरेदीची, फराळ करण्याची लगबग सुरु झाली आहे. दिवाळी म्हटलं की चकली, चिवडा, लाडू या पदार्थांनी भरलेलं ताट डोळ्यासमोर येतं. खरं तर दिवाळीच्या फराळामध्ये लाडू, करंज्यांशिवाय अन्य अनेक पदार्थ केले जातात. मात्र, सध्याच्या काळात हे पदार्थ आता लुप्त होताना दिसत आहेत. यातलाच एक पदार्थ म्हणजे चिरोटे. दिवाळीसाठी करण्यात येणारे साधे गोडाचे चिरोटे कसे करायचे हे पाहुयात…

साहित्य

  • मैदा
  • तूप
  • साखर
  • पाणी
  • वेलची
  • जायफळ
  • तेल

कृती

  • चिरोटे बनवण्यासाठी सर्वप्रथम तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर मैद्यात ओता.
  • त्यानंतर मैदा व्यवस्थित मळून घ्या. पिठात आवश्यकतेनुसार पाणी ओतून मैद्याचे पीठ व्यवस्थित मळून घ्या.
  • मळून झालेले पीठ अर्धा तास कॉटनच्या कापड्यात काहीवेळ झाकून ठेवा.
  • त्यानंतर वाटीभर मैदा घेऊन त्यात तूप टाकून पेस्ट बनवा. जास्त तूप टाकू नये.
  • मळून घेतलेल्या कणिकाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. त्यानंतर चार गोळ्यांच्या बारीक पुऱ्या लाटून घ्या.
  • त्यावर तुपाची पेस्ट लावून एकावर एक पोळी ठेवा. त्यानंतर त्याचा रोल बनवून सुरीच्या साहाय्याने बारीक काप करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेले चिरोटे टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • चिरोटे भाजून झाल्यानंतर साखरेच्या पाकात काहीवेळ मुरण्यासाठी ठेवा.
  • अशा पद्धतीने तयार आहेत नाजूक पाकळ्यांचे खमंग चिरोटे.
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews