Lakshmi Pujan 2025 : दिवाळीच्या खास दिवशी लक्ष्मीमातेसाठी बनवा ‘गुळाच्या शिऱ्याचा’ नैवेद्य!

Published:
दिवाळीत लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी गुळाच्या शिऱ्याचा नैवेद्य बनवू शकता, कारण गुळाचा शिरा देवी लक्ष्मीला प्रिय मानला जातो आणि त्यामुळे घरात समृद्धी येते.
Lakshmi Pujan 2025 : दिवाळीच्या खास दिवशी लक्ष्मीमातेसाठी बनवा ‘गुळाच्या शिऱ्याचा’ नैवेद्य!

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जात असून या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते. या दिवशी देवीच्या पूजा-आराधनेसोबतच तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक पदार्थ प्रिय आहेत, ज्यामध्ये गुळाचा शिरा हा एक महत्त्वाचा नैवेद्य आहे. दिवाळीच्या काळात हा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो, ज्यामुळे देवी लक्ष्मी घरात धन-समृद्धी घेऊन येते असे मानले जाते.

साहित्य

  • रवा
  • गूळ
  • तूप
  • काजू, बदाम, मनुका यांसारखे सुकामेवा
  • वेलची पावडर
  • पाणी

कृती

  • एका कढईत तूप गरम करून त्यात रवा सोनेरी होईपर्यंत भाजा.
  • रवा भाजल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या.
  • त्याच कढईत पाणी आणि गूळ एकत्र करून उकळायला ठेवा. गुळाचा पाक होऊ देऊ नका, फक्त गूळ वितळू द्या.
  • पाण्यात गूळ विरघळल्यावर त्यात भाजलेला रवा हळूहळू टाका आणि गुठळ्या होऊ न देता सतत ढवळत राहा.
  • शिरा घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • शेवटी त्यात वेलची पूड आणि सुकामेवा घालून मिक्स करा.
  • गरम असतानाच नैवेद्य तयार होईल आणि तुम्ही तो लक्ष्मीमातेला अर्पण करू शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)