Lakshmi Pujan 2025 : देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत ‘मखाण्याच्या खीर’ लक्ष्मीपूजनाला न विसरता दाखवा नेवैद्य

Published:
दिवाळीच्या विशेष प्रसंगी घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहावी म्हणून लक्ष्मीमातेला नैवेद्य अर्पण केला जातो.
Lakshmi Pujan 2025 : देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत ‘मखाण्याच्या खीर’ लक्ष्मीपूजनाला न विसरता दाखवा नेवैद्य

दिवाळीला नुकतीच सुरूवात झाली आहे. वसूबारस, धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. आज लक्ष्मीपूजनचा दिवस आहे. आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची शुभ मुहूर्तावर खास पूजा केली जाते. देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आज देवीला मखाण्याच्या खीरीचा खास नैवेद्य दाखवू शकता. याची रेसिपी एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे. चला तर मग जाणून घेऊयात, ही रेसिपी…..

साहित्य

  • मखाणे 
  • दूध
  • साखर
  • वेलची पूड
  • केशर (ऐच्छिक)
  • बदाम, काजू, पिस्ते (बारीक चिरलेले)

कृती

  • एका भांड्यात थोडे तूप गरम करून त्यात मखाणे सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
  • एका वेगळ्या भांड्यात दूध उकळायला ठेवा.
  • दूध गरम झाल्यावर त्यात भाजलेले मखाणे घाला आणि ते चांगले शिजवून घ्या.
  • नंतर त्यात चवीनुसार साखर आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा.
  • केशरचे काही धागे आणि चिरलेला सुकामेवा घालून खीर २-३ मिनिटे शिजवा.
  • गरमागरम किंवा थंडगार खीर लक्ष्मी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews