Marathi News

Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मीपूजनाला दाखवा ‘शेवयांच्या खीरीचा’ नैवेद्य, पाहा रेसिपी…

Published:
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जात असून या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते. या दिवशी देवीच्या पूजा-आराधनेसोबतच तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो.
Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मीपूजनाला दाखवा ‘शेवयांच्या खीरीचा’ नैवेद्य, पाहा रेसिपी…

दिवाळीच्या धामधूमीला सुरूवात झाली. दिवाळीत लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे अशा अनेक पदार्थाची मेजवाणीच असते. परंतु, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कमी वेळेत कोणता गोडाचा पदार्थ देवीच्या नैवेद्याला बनवावा असा प्रश्न पडतो. अशा वेळी कमी वेळेत आणि पटकन बनणारा स्पेशल साजूक तुपातील शेवयांच्या खीरीचा बेत आखावा. चला तर मग पाहूयात ही रेसीपी कशी बनवायची….

साहित्य

  • दूध
  • शेवया
  • साखर
  • तूप
  • सुका मेवा काजू, बदाम, मनुका, चारोळी 

कृती

  • एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा.
  • त्यात शेवया घालून सोनेरी रंगावर भाजून घ्या.
  • आता त्यात दूध घाला आणि शेवया मऊ होईपर्यंत शिजवा.
  • शेवया शिजल्यानंतर त्यात साखर आणि ड्रायफ्रुट्स घाला.
  • साखर विरघळेपर्यंत आणि खीर घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • गरम किंवा थंड खीर नैवेद्यासाठी तयार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews