Marathi News

Rama Ekadashi : रमा एकादशी कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व

Published:
कार्तिक महिन्यामधील पहिली एकादशी खूप खास मानली जाते ती म्हणजे रमा एकादशी होय.
Rama Ekadashi : रमा एकादशी कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व

कार्तिक महिना हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. रमा एकादशी देखील याच महिन्यात येते. एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा असते. एक एकादशी कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी म्हणतात. रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्व एकादशींमध्ये रमा एकादशीचे महत्त्व अनेक पटींनी मोठे मानले जाते. रमा एकादशी इतर दिवसांपेक्षा हजारो पटीने अधिक फलदायी मानली जाते. असे म्हणतात की जो कोणी हे व्रत पाळतो त्याच्या आयुष्यातील सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात.

रमा एकादशीचे महत्त्व

‘रमा’ हे देवी लक्ष्मीचेच एक नाव आहे, म्हणून या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने धन-वैभव आणि समृद्धी मिळते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे आणि पूजेमुळे नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, म्हणूनच याला विशेष महत्त्व आहे. 

रमा एकादशी कधी आहे?

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल. एकादशी तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार रमा एकादशी व्रत शुक्रवार17 ऑक्टोबर रोजी पाळले जाईल.

रमा एकादशीची पूजा पद्धत

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे.
  • घरातील देवतांची पूजा करावी आणि भगवान विष्णूंना पिवळी फुले, चंदन आणि तुळस अर्पण करावी.
  • धूप-दीप लावून आरती करावी.
  • भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा.
  • श्रीसूक्ताचे पठण करावे. या वेळी लक्ष्मी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि दारिद्र्य देखील दूर होईल.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews