दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे, दिवाळी म्हंटलं पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे फराळ. फराळाशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. घराघरांमध्ये आता दिवाळीच्या फराळाची लगबग सुरु झाली आहे. आज आम्ही तुम्हाला खुशखुशीत आणि पौष्टिक पालक पाऱ्या घरी कशा तयार करायच्या याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. आपल्या दिवाळीच्या फराळात तुम्ही या पदार्थाचा समावेश करू शकता. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती….

साहित्य

  • 2 कप चिरलेला पालक
  • 1 कप मैदा
  • 2 कप गव्हाचे पीठ
  • 1/2 कप बेसन
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा चाट मसाला
  • 3 चमचे रवा
  • 1/2 चमचा जिरे
  • 1/2 चमचा काळी मिरी

कृती

  • पालक पाऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम बारीक केलेला पालक स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • आता मैदा, गव्हाचे पीठ, बेसन, लाल तिखट, रवा, जिरे, काळी मिरी आणि पालक एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्या.
  • साधारण १५-२० मिनिट हे पीठ झाकून ठेवा.
  • मग या पिठाचा गोळा तयार करून लाटून घ्या
  • लाटताना याची जाडी फार बारीक आणि फार जाड अशी न करताना मध्यम असुद्या
  • आता पोळीप्रमाणे गोल लाटल्यांनंतर चाकूच्या मदतीने याचे काप करा
  • दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल चांगले गरम झाले की यात तयार पाऱ्या टाका
  • मध्यम आचेवर या पाऱ्या छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • अशाप्रकारे तुमच्या पालक पाऱ्या तयार होतील.
  • तयार पालक पाऱ्यांचा आस्वाद घ्या.