Diwali 2025 : दिवाळीत ‘या’ सोप्या टिप्स वापरून करा खिडकीच्या काचा स्वच्छ…

Published:
दिवाळी अगदी जवळ आली आहे. दिवाळीची पहिली सुरुवात ही साफसफाईने होते. हल्ली प्रत्येकजण कामाला जातात त्यामुळे स्वच्छतेसाठी फार कमी वेळ मिळतो. अशावेळी या सोप्या पद्धतीने करा घरची साफसफाई. 
Diwali 2025 :  दिवाळीत ‘या’ सोप्या टिप्स वापरून करा खिडकीच्या काचा स्वच्छ…

दिवाळीचा सण जवळ आला आहे. असं म्हटलं जातं की, ज्या घरात साफसफाई आणि स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असतो. दिवाळी हा देवी लक्ष्मीचा सण. या सणात देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. घर साफ करताना सर्वात कठीण गोष्ट म्हणजे खिडकी साफ करते. या दरवाजांच्या ट्रॅकवर भरपूर धूळ आणि कचरा सहजपणे जमा होतो, जो साफ करणे प्रत्येकाच्या हातात नसते. घर स्वच्छ करण्यासोबतच दारे आणि खिडक्यांच्या स्लायडिंग खिडक्यांत खाण जमा होते. त्यासाठी या टिप्स फॉलो करा. अशावेळी स्वच्छता करण्यासाठी या  टिप्स तुम्हाला साफसफाई करण्यास मदत करतात.

व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण

  • एक स्प्रे बाटलीत अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग पांढरा व्हिनेगर एकत्र करा.
  • हे मिश्रण खिडकीच्या काचेवर फवारा आणि मऊ कापडाने किंवा वृत्तपत्राने पुसा.
  • व्हिनेगरमुळे काचेवरील चिकट थर निघून जातो आणि काच चमकदार होते.

बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण

  • जर काचा खूपच खराब झाल्या असतील, तर पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा.
  • या पेस्टचा वापर करून काचा घासून घ्या.
  • नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरड्या कापडाने पुसा

व्हिनेगर आणि बटाटा

  • खिडकीच्या काचेवर थोडे व्हिनेगर फवारा. 
  • बटाट्याचा एक तुकडा घेऊन त्याने काचेवर गोलाकार पद्धतीने घासा. बटाट्यातील स्टार्च काचेवरील धूळ आणि डाग काढण्यास मदत करेल. 
  •  एका स्वच्छ, कोरड्या कापडाने काच पुसून घ्या, जेणेकरून डाग आणि काचेवरील पाण्याचे ओघळ निघून जातील. 

लिंबू आणि मीठ

दिवाळीच्या साफसफाईसाठी खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मिठाचा वापर केला जातो. लिंबाच्या रसात असलेले आम्ल आणि मिठातील बारीक कण डाग काढण्यास मदत करतात. ही एक सोपी, घरगुती आणि प्रभावी पद्धत आहे.

  • एका भांड्यात लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून जाडसर पेस्ट बनवा.
  • ही पेस्ट जुन्या ब्रशच्या मदतीने किंवा थेट कापडाने काचेच्या पृष्ठभागावर लावा. डागांवर आणि हट्टी घाणीवर जास्त लक्ष द्या.
  • हे मिश्रण काचेवर साधारण ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या, जेणेकरून ते डाग काढेल.
  • स्वच्छ आणि ओल्या कापडाने किंवा कागदी टॉवेलने मिश्रण पुसून टाका.
  • काचेच्या पृष्ठभागावर स्वच्छ कापड फिरवून ते पूर्णपणे कोरडे करा आणि चमकदार बनवा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)