Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला यमदीपदान करताना 13 दिवे का अर्पण करावे? जाणून घ्या कारण…

Published:
यमदीपदान' म्हणजे यम राजाला दिवा दान करणे. या दिवशी सायंकाळी घराबाहेर किंवा अंगणात एक दिवा लावला जातो, जो यम राजाला समर्पित असतो.
Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला यमदीपदान करताना 13 दिवे का अर्पण करावे? जाणून घ्या कारण…

धनत्रयोदशीसपासून पाच दिवसीय दीपोत्सव उत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि देव धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी घरात शुभ वस्तू आणल्या जातात. शिवाय दीपदानाचे कार्य देखील शुभ मानले जाते. दरवर्षी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित केला जातो. हा एकमेव विशेष दिवस आहे जेव्हा यमराजाची पूजा केली जाते. यमदीपदान करण्याचा मुख्य उद्देश यमराजांना प्रसन्न करून अकाली मृत्यूपासून बचाव करणे हा आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान करण्याची परंपरा

प्रदोषकाळात यमदीप दान करण्याची परंपरा आहे. दिवा तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठात हळद घालून पिठ मळून घ्या. नंतर त्याचा दिवा बनवावा. काही ठिकाणी चारमुखी दिवा बनवला जातो. त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन दोन लांब वाती करा. त्यांना दिव्यामध्ये एकमेकांच्या आडव्या दिशेने अशा प्रकारं ठेवा की वातीची चार टोकं दिव्याच्या बाहेर आपणास दिसतील. आता त्यात तिळाचं तेल टाका. कुंकू, अक्षत आणि फुलांनी दिव्याची पूजा करा. यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर तांदूळ किंवा गव्हावर दक्षिण दिशेला हा यमाच्या नावाने दीवा लावा. यानंतर ॐ यमदेवाय नमः जप करताना दक्षिण दिशेला नमस्कार करावा.

धनत्रयोदशीला यमदीपदान करताना 13 दिवे का अर्पण करावे?

धनत्रयोदशीच्या दिवशी 13 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी केलेले शुभ कार्य 13 पट अधिक शुभ फळ देते.  धनत्रयोदशीला संध्याकाळच्या वेळेस 13 दिवे प्रज्वलित केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि निरोगी आरोग्य प्राप्त होते. 13 दिव्यांपैकी पहिला दिवा घरच्या प्रवेशद्वाराबाहेर ठेवावा, दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला ठेवावे. दुसरा दिवा धनाची देवता लक्ष्मीमातेसमोर ठेवावा. एक दिवा तुळशीच्या रोपासमोर ठेवावा. एक दिवा घराच्या मधोमध ठेवावा उर्वरित दिवे घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये ठेवावे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)