Marathi News

Ganesh Stotra : संपूर्ण संकटनाशक गणेश स्तोत्र, जाणून घ्या कोणी केली रचना?

Published:
संकट निवारण हे स्तोत्र पठण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात.
Ganesh Stotra : संपूर्ण संकटनाशक गणेश स्तोत्र, जाणून घ्या कोणी केली रचना?

गणपतीचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा. हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे. असे केल्याने सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामं होऊ लागतात. संकटनाशक गणेश स्तोत्रात भगवान गणेशाच्या १२ नावांचा उल्लेख असून, या स्तोत्रातून त्यांचे विविध रूप आणि गुणांचे सुंदर वर्णन केले आहे, ज्यामुळे भक्तांच्या जीवनातील संकटं दूर होतात आणि त्यांना शुभफळे मिळतात. संकटनाशक गणेश स्तोत्र नारद पुराणात समाविष्ट आहे आणि या स्तोत्राची रचना देवर्षी नारदांनी केली आहे. हे स्तोत्र संकट निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते आणि याचे पठण केल्याने जीवनातील सर्व विघ्ने, दुःख आणि अडचणी दूर होतात.

नारद पुराणात उल्लेख

महादेवाच्या आदेशाने देवर्षी नारद यांनी संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण केला आणि त्यामुळे त्यांची संकटातून सुटका झाली. या स्तोत्रात वक्रतुण्ड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्त्र, लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपति आणि गजानन अशा १२ नावांचा समावेश आहे. जो भक्त या बाराही नावांचे दररोज जप करतो, त्याला कोणत्याही विघ्नाचे भय राहत नाही.

॥ श्री गणपती स्तोत्र ॥ 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥

प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥

पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥

नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥

देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥

जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥

नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥

॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews