Dev Uthani Ekadashi 2025 : एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा भगरचा उपमा, पाहा सोपी रेसिपी

Published:
उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही भगरचा उपमा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.
Dev Uthani Ekadashi 2025 : एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा भगरचा उपमा, पाहा सोपी रेसिपी

उपवासाच्या दिवशी आहारात मोजक्याच पदार्थांचे सेवन केले जाते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा किंवा वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भगरचा उपमा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया भगरचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी…

साहित्य

  • २ वाट्या भाजलेली भगर
  • ४ वाट्या पाणी
  • ८ हिरव्या मिरच्या (लांबीच्या दिशेने चिरलेल्या)
  • मीठ, चवीनुसार
  • चमचे तेल 

कृती

  • एका कढईत भगर मंद आचेवर सुमारे ५ मिनिटे भाजून घ्या.
  • त्याच कढईत तेल गरम करून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
  • आता यात ४ वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
  • पाण्याला उकळी आल्यावर त्यात भाजलेली भगर टाका.
  • झाकण ठेवून मंद आचेवर भगर शिजवा.
  • गरमागरम उपमा सर्व्ह करा. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews