Rath Saptami 2026 : रथ सप्तमीच्या दिवशी काय काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या…

Published:
रथ सप्तमी हा सूर्यदेवाला समर्पित दिवस आहे, जो आरोग्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी सकारात्मक गोष्टी करून आणि नकारात्मक गोष्टी टाळून सूर्याची कृपा मिळवता येते.
Rath Saptami 2026 : रथ सप्तमीच्या दिवशी काय काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या…

हिंदू धर्मात रथ सप्तमी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. रथ सप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी कापणीच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या दिवसापासून उन्हाळाही सुरू होतो. हा दिवस दानधर्मासाठी विशेष मानला जातो. या दिवशी दान केल्याने भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.

रथ सप्तमीचे महत्त्व

रथ सप्तमी सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो, जेव्हा ते उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात. या दिवशी केलेले दानपुण्य सूर्यग्रहणासारखे शुभ मानले जाते आणि पापांचा नाश होतो.  हा दिवस उत्तरायण सुरू होण्याचे प्रतीक आहे. या दिवशी केलेल्या पूजेमुळे धन, संपत्ती आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. सूर्याची उपासना केल्याने आरोग्य, तेज आणि दीर्घायुष्य मिळते, अशी श्रद्धा आहे.

रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे?

  • रथ सप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा, शक्य असल्यास पवित्र नदीत, अन्यथा घरातच.
  • पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा.
  • तांब्याच्या भांड्यात पाणी, अक्षता, रोळी आणि लाल फुले घेऊन सूर्याला अर्घ्य द्या.
  • “ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः” किंवा १२ आदित्यांची नावे घ्या.
  • आदित्य हृदय स्तोत्र, सूर्य अष्टक किंवा सूर्य चालीसाचे पठण करा.
  • तुपाचा दिवा लावा, धूप, अगरबत्ती, लाल फुले, फळे अर्पण करा.
  • घरासमोर सूर्यदेवाच्या रथाची रांगोळी काढा.
  • गरीब आणि गरजू लोकांना गूळ, तांदूळ, तांबे, लाल कपडे, गहू दान करा.
  • फलाहार किंवा एकभुक्त राहून व्रत ठेवा.

रथ सप्तमीच्या दिवशी काय करू नये?

  • रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाची उपासना करण्याचा असल्याने, या दिवशी मांसाहार करणे किंवा मद्यपान करणे टाळावे.
  • खोटं बोलणे, कोणाची निंदा करणे किंवा वाईट विचार करणे टाळावे.
  • या दिवशी घरातील वातावरण शांत ठेवावे, भांडणे किंवा वाद घालू नयेत.
  • सूर्यदेवाची उपासना आणि स्नान महत्त्वाचे असल्याने, आळस टाळावा.
  • शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, उशीरापर्यंत झोपू नये.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews