Lingastakam Stotra : महाशक्तिशाली लिंगाष्टकम् स्तोत्राचे पठण करा, संकट दूर होईल

Published:
शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेसाठी लिंगाष्टकम स्तोत्राचा उल्लेख केला आहे.
Lingastakam Stotra : महाशक्तिशाली लिंगाष्टकम् स्तोत्राचे पठण करा, संकट दूर होईल

शिवलिंग हे भगवान शंकराचे साकार स्वरुप मानले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासोबत या महाशक्तिशाली लिंगाष्टकम् स्तोत्राचे पठण केले तर कितीही कठीण वेळ आली तरी त्याला प्रत्येक समस्येचे समाधान मिळते आणि तो काही वेळातच संकटांतून मुक्त होतो.

लिंगाष्टकम् स्तोत्राचे महत्व

शक्तिशाली लिंगाष्टकम् स्तोत्र म्हणजे भगवान शंकराच्या उपासनेसाठी एक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे, जे सर्व संकटं दूर करते. हे स्तोत्र ‘आदि शंकराचार्यांनी’ रचले आहे आणि ‘शिव पुराणा’मध्ये याचा उल्लेख आहे. या स्तोत्राचा जप केल्याने मुलांच्या संज्ञानात्मक क्षमता विकसित होण्यास मदत होते आणि ते भक्ती आणि शुद्धीकरणासाठी फायदेशीर आहे. लिंगाष्टकम् स्तोत्र हे अत्यंत चमत्कारिक मानले जाते. हे पठण केल्याने सर्व संकटे काही वेळातच दूर होतात आणि वाईट काळही संपतो.

लिंगाष्टकम् स्तोत्र

ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम् ।
जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥१॥
देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहं करुणाकरलिङ्गम् ।
रावणदर्पविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥२॥
सर्वसुगन्धिसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गम् ।
सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥३॥
कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गम् ।
दक्षसुयज्ञविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥४॥
कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गम् ।
सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥५॥
देवगणार्चितसेवितलिङ्गं भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गम् ।
दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥६॥
अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् ।
अष्टदरिद्रविनाशितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥७॥
सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गम् ।
परात्परं परमात्मकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥८॥
लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews