Marathi News

Christmas 2025 : ख्रिसमस ट्रीची सुरूवात कशी झाली? जाणून घ्या ख्रिसमस ट्रीचा रंजक इतिहास..

Published:
25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन लोक आपल्या घरांना सजवतात आणि ख्रिसमस ट्री आपल्या घरात लावतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा कुठून सुरू झाली. याबद्दल जाणून घेऊयात..
Christmas 2025 : ख्रिसमस ट्रीची सुरूवात कशी झाली? जाणून घ्या ख्रिसमस ट्रीचा रंजक इतिहास..

ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, जो २५ डिसेंबरला साजरा होतो, हा आनंद, प्रेम आणि शांततेचा सण आहे. या दिवशी लोक चर्चमध्ये सेवा करतात, तर काही ठिकाणी येशूच्या जन्माचे देखावे सादर केले जातात. या सणाला एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. प्रत्येक घरात एक सुंदर ख्रिसमस ट्री सजवला जातो, ज्यावर लाईट्स, चॉकलेट्स, आणि विविध उपहार ठेवले जातात. या सर्व परंपरांनी ख्रिसमसला महत्त्व आलं आहे.

ख्रिसमस ट्रीची सुरूवात कशी झाली?

ख्रिसमसच्या ट्रीची परंपरा हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली होती. रोम साम्राज्यात ही सदाहरित असणारी झाडे घर सजवण्यासाठी वापरली जात असत. एकदा मार्टिन ल्यूथर 24 डिसेंबरच्या संध्याकाळी एका बर्फाच्छादित जंगलात फिरत होते. जिथे त्यांना हे सदाहरित झाड दिसले. चंद्राच्या प्रकाशाने या झाडाच्या फांद्या चमकत होत्या. त्याचे सौंदर्य पाहून भूललेले मार्टिन लूथर ते झाड घेऊन घरी आले आणि घरात हा सदाहरित वृक्ष लावला.

ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सर्वप्रथम जर्मनीमध्ये, इसवी सन 1500 मध्ये सुरु झाली. ख्रिस्ती धर्माचे सोळाव्या शतकातील सुधारक मार्टिन ल्यूथर यांनी या झाडाला घरी आणून सजवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला, लाकडी पिरॅमिड वापरले जात असत किंवा संसाधने कमी असल्यास सदाहरित झाडं  वापरली जात, ज्यांना मेणबत्त्या लावून सजवले जायचे. ही सदाहरित झाडं जीवनाचं आणि येशूच्या शिकवणीचं प्रतीक मानली जातात, जी कधीही न संपणाऱ्या प्रेमाची आणि शांतीची आठवण करून देतात.  हळूहळू ही परंपरा युरोपमधून इतर देशांमध्ये पसरली आणि आज जगभरात ख्रिसमस ट्री सजवण्याची प्रथा आहे, जी ख्रिसमसच्या उत्सवाला एक वेगळी ओळख देते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews