जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमस हा असा सण आहे, जो ख्रिश्चन धर्मासोबत इतर धर्माचे लोकही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यंदाही दरवर्षीप्रमाणे 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का ख्रिसमस 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो ? याबद्दल जाणून घेऊयात…
ख्रिसमस 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो?
रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनच्या काळात, ३३६ साली हा उत्सव पहिल्यांदा साजरा झाला. नंतर पोप ज्युलियस यांनी २५ डिसेंबरला येशूचा अधिकृत वाढदिवस म्हणून घोषित केले, असे मानले जाते. बायबलमध्ये येशूच्या जन्माची नेमकी तारीख दिलेली नाही, त्यामुळे चर्चने हा प्रतीकात्मक दिवस निवडला. रोममधील चर्चने 25 डिसेंबर 336 रोजी ख्रिसमस साजरा करण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, 25 डिसेंबरच्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यामुळे नाताळच्या दिवशी ख्रिश्चन लोक एकत्र येऊन प्रभु येशूची पूजा करतात.
ख्रिसमसचे धार्मिक महत्त्व काय आहे?
ख्रिस्ती धर्मात येशूला देवाचा पुत्र आणि जगाचा तारणहार मानले जाते, ज्याचा जन्म मानवजातीला वाचवण्यासाठी झाला. येशूने दिलेली प्रेम, करुणा आणि क्षमा या शिकवणींचा हा दिवस आहे. हा दिवस पापांपासून मुक्ती आणि नवीन जीवनाची सुरुवात दर्शवतो, जसा देवदूत म्हणाला, “तुझ्यासाठी तारणहार जन्माला आला आहे”. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना, बायबल पठण आणि ख्रिस्ती लोक एकत्र येऊन येशूच्या जन्माचे स्मरण करतात. ख्रिसमस हा केवळ येशूचा जन्मदिवस नसून, तो जगाला प्रेम, आशा आणि तारण देणाऱ्या देवाच्या कृपेचे प्रतीक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





