MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

Cake Baking Tips : नाताळ निमित्त केक बनवताना लक्षात ठेवा काही खास टिप्स…

Published:
नाताळ निमित्त केक बनवताना या टिप्स वापरून तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट ख्रिसमस केक बनवू शकता आणि सेलिब्रेशनची मजा द्विगुणित करू शकता!.
Cake Baking Tips : नाताळ निमित्त केक बनवताना लक्षात ठेवा काही खास टिप्स…

नाताळ सण आता काही दिवसांवर आला असून, संपूर्णं जगभरात साजरा केला जाणार हा सण भारतात देखील उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी विविध प्रकारचे केक आणि डेझर्ट बनवले जातात. यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला आणखी खास बनवण्यासाठी आपण स्वत: केक बनवू शकता. परंतु, केक बनवण्यापूर्वी आपल्याला काही टिप्स लक्षात घ्याव्या लागतील, जेणेकरून आपला केक आणखी चविष्ट बनेल याबद्दल जाणून घेऊयात…

केक बनवताना लक्षात ठेवण्यासारख्या काही खास टिप्स

  • सर्व साहित्य अचूक प्रमाणात घ्या.
  • अंडी, दूध, बटर यांसारखे सर्व साहित्य खोलीच्या तापमानावर असावे, यामुळे केक चांगला फुलतो.
  • मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्या, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि केक हलका होईल.
  • ओले आणि कोरडे मिश्रण एकत्र केल्यावर ते जास्त वेळ फेटू नका, फक्त सर्व साहित्य एकत्र होईपर्यंतच मिक्स करा, नाहीतर केक कडक होऊ शकतो.
  • बेकिंग करण्यापूर्वी ओव्हन किंवा कुकर व्यवस्थित गरम करून घ्या.
  • सर्व साहित्य घातल्यावर बॅटर जास्त फेटू नका, हलक्या हाताने मिक्स करा.
  • केकसाठी नेहमी बेकिंग पेपर लावलेले भांडे वापरा, जेणेकरून केक चिकटणार नाही. 
  • सांगितलेल्या वेळेपेक्षा जास्त बेक करू नका, नाहीतर केक कडक होऊ शकतो. मध्येच टूथपिक घालून चेक करा, ती स्वच्छ बाहेर आल्यास केक तयार आहे.

हेल्दी पर्याय

  • मैद्याऐवजी: गव्हाचे पीठ, ओट्स, किंवा बदाम पावडर वापरा. यामुळे फायबर वाढते आणि पचन सुधारते.
  • साखरेऐवजी: गूळ, खजूर पेस्ट, मॅपल सिरप किंवा पिकलेल्या फळांचा (केळी, पेरू) वापर करा. यामुळे केकचा ग्लिसेमिक इंडेक्स कमी होतो.
  • फळांचा वापर: पेरू, सफरचंद, केळी यांसारखी फळे वापरून केक अधिक पौष्टिक बनवा.
  • अंड्यांसाठी पर्याय: अंड्याऐवजी दही, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरू शकता.
  • सुकामेवा आणि बिया: अक्रोड, बदाम, जवस किंवा चिया सीड्स घाला. यामुळे पोषण आणि कुरकुरीतपणा येतो. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)