नाताळ सण आता काही दिवसांवर आला असून, संपूर्णं जगभरात साजरा केला जाणार हा सण भारतात देखील उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी विविध प्रकारचे केक आणि डेझर्ट बनवले जातात. तुम्ही देखील यंदाचा नाताळला काही खास करू इच्छित असाल, तर घरच्या घरी अगदी स्वादिष्ट केक बनवू शकता.
साहित्य
- १ कप मैदा
- १ कप मिल्क पावडर
- 1 कप दूध
- १ कप पिठी साखर
- ४ ते ५ थेंब व्हॅनिला इसेंस
- १ टीस्पून बेकींग पावडर
- अर्धा टी स्पून बेकींग सोडा
- १ टेबल स्पून लिंबाच रस
- ४ चमचे वितळलेलं तूप
- बदाम, काजू, मणूके, पिस्ते, अक्रोड यांचे काप अर्धा कप.
कृती
- सगळ्यात आधी कुकरची शिटी आणि वायर काढा. कुकरमध्ये एक वाटी मीठ टाका. त्यात थोडे उंच होईल असे स्टॅण्ड किंवा वाटी ठेवा आणि हे कुकर झाकण लावून मध्यम गॅसवर १० मिनिटे प्री हिट करायला ठेवा.
- त्यानंतर मैदा, पिठीसाखर, तूप, दूध, इसेंस, बेकींग पावडर, बेकींग सोडा हे सगळे साहित्य एका बाऊलमध्ये टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून सैलसर पीठ तयार करून घ्या. सुकामेवा घालून हळूवारपणे मिक्स करा.
- ज्या डब्यात केक लावणार आहात त्याला बटर आणि मैदा लावून ग्रिसींग करून ठेवा. त्यात आता केकचे मिश्रण टाका आणि हा डबा प्री हीट साठी ठेवलेल्या कुकरमध्ये ठेवा.
- सुरुवातीला २५ मिनिटे गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवा. त्यानंतर पुढच्या १० मिनिटांसाठी गॅसची फ्लेम लहान ते मध्यम ठेवा.- त्यानंतर केकच्या मध्यभागी टुथपिक किंवा चाकू टाका आणि केक चांगला बेक झाला आहे की नाही हे तपासा.
- चाकूला किंवा टूथपिकला जर चिकट ओलसर पीठ चिटकले नाही, तर केक छान बेक झाला आहे हे समजावे आणि गॅस बंद करावा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





