नाताळ सण आता काही दिवसांवर आला असून, ख्रिसमसच्या निमित्ताने लोक अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. केक खाऊन ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत ख्रिसमस स्पेशल केकची सोपी रेसिपी…
साहित्य
- बारीक रवा – 1 वाटी
- साखर – 1 वाटी
- दही – 1 वाटी
- तूप – दीड वाटी
- वेलची पूड – चिमूटभर
- बेकिंग पावडर – 1 चमचा
- बेकिंग सोडा – 1 चमचा
- दूध – 3 ते 4 चमचे
- सुका मेवा
कृती
- बारीक रवा, साखर आणि दही एकत्र करून फेटून घ्यावा. मिश्रणात तूप, वेलची पूड, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून मिक्स करा. तयार मिश्रण 10 मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून रवा फुगेल.
- 10 मिनिटांनंतर मिश्रणात दूध घालून पुन्हा एकत्र करून घ्या. यानंतर मिश्रणात सुकामेवा बारीक करून घालावा.
- आता केक तयार करण्यासाठी कढईत मूठभर मीठ घालून त्यावर स्टँड ठेवा.
- कढई 10 मिनिटे मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
- आता टिनला तेल लावा आणि तयार मिश्रण त्यात ओता.
- आता गरम कढईत टिन ठेवा आणि झाकण ठेवून 40 मिनिटे शिजू द्या.
- अध्येमध्ये टूथपिकने केक शिजला आहे का नाही चेक करत राहावा.
- टुथपिक स्वच्छ निघाली की केक तयार झाली आहे हे समजा.
- 30-35 मिनिटांनी भांड बाहेर काढून घ्या आणि 10-15 मिनिट थंड होऊ द्यावं मग कडा मोकळ्या करून घ्याव्या.
- अशा पद्धतीने तयार झाला आहे ख्रिसमस स्पेशल फ्रेश होम मेड स्पॉंजी केक बनून तयार…
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





