Devi Laxmi Mantra : लक्ष्मी मातेच्या ‘या’ मंत्रांचा करा जप, कायम राहील कृपा

Published:
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धन संपत्ती सुख, शांती समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते.
Devi Laxmi Mantra : लक्ष्मी मातेच्या ‘या’ मंत्रांचा करा जप, कायम राहील कृपा

शुक्रवारचा दिवस भगवान शुक्र आणि देवी लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीची देवी यांना समर्पित आहे. असे मानले जाते की जे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करतात, त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

मंत्राच्या पठणाचे फायदे

‘विष्णुप्रिया नमस्तुभ्यं, नमस्तुभ्यं जगद्वते’ या मंत्राच्या पठणाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या मंत्राच्या नियमित पठणाने आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मानले जाते. हा मंत्र आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि घरात धन-संपत्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. या मंत्राच्या नियमित पठणाने यशाचे नवीन मार्ग खुले होतात.  हा मंत्र संकटांवर मात करण्यास मदत करतो आणि पापांचा नाश करतो. 

मंत्र

‘विष्णुप्रिये नमस्तुभ्यं, नमस्तुभ्यं जगद्धिते। अर्तिहंत्री नमस्तुभ्यं, समृद्धिं कुरु मे सदा॥’
हा एक प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की, हे विष्णूप्रिये, जगाचे हित करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. दु:ख दूर करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. तू नेहमीच माझ्या समृद्धीचे कारण हो. 

मंत्राचा अर्थ

  • विष्णुप्रिया नमस्तुभ्यं: हे विष्णूची प्रिय पत्नी असलेल्या लक्ष्मीला उद्देशून आहे. यामुळे भक्त देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची प्रार्थना करतो.
  • नमस्तुभ्यं जगद्वते: म्हणजे ‘संपूर्ण जगाचे कल्याण करणाऱ्या देवी, तुला माझा नमस्कार असो’.
  • आर्त हंत्रि नमस्तुभ्यं, समृद्धं कुरु मे सदा: या ओळींचा अर्थ आहे की, ‘दुःख दूर करणाऱ्या देवी, तुला माझा नमस्कार असो, आणि मला नेहमी समृद्धी प्रदान कर.’. 

मंत्राचे पठण कसे करावे?

  • सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ व पवित्र वस्त्र परिधान करावे.
  • लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून दिवा लावावा आणि शांतचित्ताने मंत्राचा जप करावा.
  • जप करताना मनात फक्त लक्ष्मीचे स्मरण करावे. मंत्राची सुरुवात ‘विष्णुप्रिया नमस्तुभ्यं…’ या ओळीने करावी आणि त्यानंतर ‘आर्त हंत्रि…’ या ओळींनी करावी.
  • जास्तीत जास्त सकारात्मकतेने आणि श्रद्धेने जप केल्यास चांगला परिणाम मिळतो, असे मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews