Kharmas 2025 : आजपासून ‘धनुर्मासारंभ’, यादरम्यान काय करावे जाणून घ्या…

Published:
सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा धनुर्मास (खरमास) सुरू होतो. हा कालावधी अध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित मानला जातो आणि या महिन्यात केलेली पुण्यकर्मे अधिक फळ देतात, असे मानले जाते.
Kharmas 2025 : आजपासून ‘धनुर्मासारंभ’, यादरम्यान काय करावे जाणून घ्या…

हिंदू धर्मात खरमासाला विशेष महत्त्व आहे. मंगळवार 16 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4 वाजून 26 मिनिटांनी खरमासाची सुरूवात होईल. आणि 15 जानेवारी 2026 रोजी खरमास संपेल. धनुर्मास हा आत्मचिंतन, अध्यात्मिक उन्नती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठीचा काळ मानला जातो, जो 14जानेवारी (मकर संक्रांती) पर्यंत असतो आणि त्यानंतर पुन्हा शुभ कार्यांची सुरुवात होते. खरमासात काय करावे जाणून घेऊयात…

काय आहे खरमास (धनुर्मास)?

खरमास म्हणजे सूर्याच्या धनु किंवा मीन राशीतील प्रवेशामुळे येणारा सुमारे ३० दिवसांचा कालावधी असतो, जो वर्षातून दोनदा येतो. यावेळी देवगुरु बृहस्पती यांची ऊर्जा कमी होते. त्यामुळे हा काळ अशुभ मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार, खरमासाच्या काळात शुभ आणि शुभ कार्यांचे पूर्ण फळ मिळत नाही. आजपासून खरमास सुरू होत आहे, त्यामुळे 30 दिवस कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. पुढील महिन्याच्या 14 तारखेला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा खरमास संपेल. यानंतर, शुभ आणि शुभ कार्य पुन्हा सुरू होईल. हा काळ सूर्यदेवाच्या धनु राशीतील प्रवेशामुळे येतो. या काळात शुभ कार्यांऐवजी आध्यात्मिक उन्नतीवर भर दिला जातो, जेणेकरून पुढील काळात येणारी शुभ कार्ये फलदायी ठरतील. 

आध्यात्मिक कार्ये

पूजा-पाठ, भगवत गीता, रामायण पठण, जप, तप आणि ध्यान करा. भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाची उपासना करावी. तुलसीपूजा करणे शुभ मानले जाते. विष्णू-सूर्यदेवाची उपासना करावी. मंत्रोच्चार, जप, तप, ध्यान, अनुष्ठान आणि भगवद्गीता पठण करणे फायदेशीर ठरते.

दान

गरजू लोकांना अन्न, वस्त्र, भोजन दान करणे, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ असते. गरजू, ब्राह्मण आणि गायींची सेवा करा. तीळ, उडीद डाळ, अन्नधान्य आणि उबदार कपड्यांचे दान करणे महत्त्वाचे आहे. या महिन्यात जप, तप आणि दान-धर्माला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे ते करावे.

स्नान

गंगा किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ असते. गंगा, गोदावरीसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा धार्मिक स्थळांना भेट देणे.

सूर्य आणि विष्णूची पूजा

भगवान सूर्य आणि भगवान विष्णूची पूजा करणे, त्यांना अर्घ्य देणे फलदायी ठरते. रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करून “ॐ घृणि सूर्याय नमः” या मंत्राचा जाप करावा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews