Mokshada Ekadashi 2025 : मोक्षदा एकादशीला बनवा चविष्ट अन् हटके उपवासाचे बटाटे वडे

Published:
आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे बटाटेवडे बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा पदार्थ लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया उपवासाचे बटाटेवडे बनवण्याची सोपी कृती.
Mokshada Ekadashi 2025 : मोक्षदा एकादशीला बनवा चविष्ट अन् हटके उपवासाचे बटाटे वडे

हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. यंदा मोक्षदा एकादशी 1 डिसेंबर 2025 रोजी साजरी केली जात आहे. मोक्षदा एकादशीला नेहमी पेक्षा हटके आणि चविष्ट असे उपवासाचे बटाटावडा करून पाहा..

साहित्य

  • उकडलेले बटाटे (३-४)
  • साबुदाण्याचे पीठ (१/४ कप)
  • शेंगदाण्याचा कूट (१/४ कप)
  • हिरव्या मिरच्यांची पेस्ट (चवीनुसार)
  • मीठ (चवीनुसार)
  • कोथिंबीर (ऐच्छिक) 

कृती

  • बटाटे उकडून त्याचे साल काढून ते पूर्णपणे मॅश करून घ्या.
  • मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये उपवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जसे की साबुदाण्याचे पीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला.
  • तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवा.
  • दुसऱ्या भांड्यात साबुदाण्याचे पीठ आणि पाणी घेऊन पातळसर भिजवून घ्या.
  • तयार केलेले गोळे या पिठात बुडवून गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तुमचे उपवासाचे बटाटेवडे तयार आहेत. मोक्षदा एकादशीच्या उपवासासाठी याचा आस्वाद घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)