हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी महालक्ष्मीची पूजा केली जाते. यंदा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार 18 डिसेंबर रोजी म्हणजेच आज आहे. आजच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाणार आहे.
मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व
मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आणि धन-धान्याची भरभराट होते. या दिवशी कलश आणि देवीची विधिवत पूजा केली जाते आणि लाह्या-फुटाणे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत घरात सुख-समृद्धी आणि शांती आणते, असे मानले जाते. मनोभावे पूजा केल्यास देवी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावर कृपा करते.
उद्यापनाचे काय आहे धार्मिक महत्त्व
मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा महालक्ष्मी व्रतासाठी महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात गुरुवारी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धन-धान्य नांदते असे म्हणतात. या व्रतासाठी कलश मांडून पूजा करतात. देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोड-धोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. या व्रतामुळे ऐश्वर्य, यश आणि धन-संपत्ती प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे.





