MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Maharashtra Politics : निवडणुकीसाठी 10 हजार कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंवर आरोपांचा बॉम्ब

Published:
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात जोरात शाब्दिक चकमक पाहायला मिळते. यातच आता खुद्द एकनाथ शिंदेंवर सर्वात मोठा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे
Maharashtra Politics : निवडणुकीसाठी 10 हजार कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंवर आरोपांचा बॉम्ब

Maharashtra Politics : मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैलीही झाडताना बघायला मिळत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात जोरात शाब्दिक चकमक पाहायला मिळते. यातच आता खुद्द एकनाथ शिंदेंवर सर्वात मोठा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंचे महापालिकेसाठीचे बजेट हे 10000 कोटी रुपयांचे असून प्रत्येक उमेदवाराला शिंदे तब्बल 10 कोटी रुपये वाटणार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

माझी माहिती पक्की – संजय राऊत (Maharashtra Politics)

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं महानगरपालिकेचं बजेट हे दहा हजार कोटी रुपयांचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते दहा कोटी रुपये देणार आहेत. माझी माहिती पक्की असते. तुम्ही साधा विचार करा, एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक फोडण्यासाठी पाच-पाच कोटी रुपये दिले. आता ते निवडणूक लढवण्यासाठी दहा-दहा कोटी रुपये देणार आहेत. हे सगळे पैसे त्यांनी महापालिकेच्या ठेकेदाराकडून घेतले किंवा ते पैसे ड्रग्स मधून आले आल्याचा आरोप करत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली.  Maharashtra Politics

राऊताना शिंदे गटाचे प्रत्युतर

दरम्यान संजय राऊत यांच्या आरोपांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संजय राऊत हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना घाबरलेले आहेत. त्यामुळे फक्त आरोप करणे हा एकमेव मार्ग संजय राऊत आणि ठाकरे गटापुढे राहिलेला आहे. चुकीच्या पद्धतीने आरोप करणे, लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, अशा प्रकारे काम त्यांच्याकडून सुरू आहेत असं म्हणत नरेश मस्के यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.