MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी केंद्राच्या मोठ्या घोषणा!! फडणवीसांनी ट्विट करत दिली खुशखबर

Published:
मुंबईकरांसाठी स्वयंचलित दरवाजा बंद प्रणाली असलेल्या २३८ नवीन गाड्या खरेदी केल्या जात आहेत. गर्दीचा ताण पडू नये म्हणून मेल एक्सप्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांची क्षमता वाढवण्यात येईल.
Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी केंद्राच्या मोठ्या घोषणा!! फडणवीसांनी ट्विट करत दिली खुशखबर

Mumbai Local Train : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पडला आहे. मुंबईकरांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन… याच लोकल ट्रेनच्या माध्यमातून दररोज लाखो मुंबईकर आपल्या कामाच्या ठिकाणाहून ये जा करतात. मात्र हा प्रवास करत असताना मुंबईकरांना नेहमीच मोठ्या गर्दीला तोड द्यावे लागते. अक्षरशः जीवावर उदार होऊन लोकल मधून प्रवास करावा लागतो. मुंबईकरांची हीच अडचण ओळखून केंद्र सरकारने मुंबई लोकल ट्रेनच्या बाबतीत अनेक घोषणा केल्या आहेत.  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेतून मुंबई लोकल ट्रेनबाबत होत असलेल्या सुधारणांबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले.

काय म्हणाले अश्विनी वैष्णव?  Mumbai Local Train

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांसाठी स्वयंचलित दरवाजा बंद प्रणाली असलेल्या २३८ नवीन गाड्या खरेदी केल्या जात आहेत. गर्दीचा ताण पडू नये म्हणून मेल एक्सप्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांची क्षमता वाढवण्यात येईल. प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत हि माहिती मुंबईकरांना सांगितली.

काय आहे फडणविसांचे ट्विट

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल कि, मुंबईकरांसाठी मोठी बातमी! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार, ज्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मुंबईतील रेल्वे सेवांची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्पांची सुरुवात केली आहे. Mumbai Local Train

स्वयंचलित दरवाजा बंद प्रणाली असलेल्या २३८ नवीन गाड्या खरेदी केल्या जात आहेत
१२० मेल एक्सप्रेस गाड्या आणि ३२०० उपनगरीय गाड्यांची क्षमता वाढवली जात आहे
वांद्रे येथे ३ पिट लाईन्स
मुंबई सेंट्रल येथे २४-डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार
एलटीटी येथे डेपोचा विस्तार
अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म:
▪️जोगेश्वरी: २
▪️दादर: १
▪️वसई रोड: ६
▪️पनवेल: ५
▪️कळंबोली: ५
▪️कल्याण: ६
▪️परळ: ६

या प्रकल्पांमुळे प्रवासात मोठी सुधारणा होईल आणि मुंबईकरांचा दररोजचा प्रवास खूप सोपा होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.