MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

BMC Election 2026 : मुंबईत भाजपकडून शिंदे गटाला फक्त 52 जागा?? आजच्या बैठकीत काय घडलं?

Published:
मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे भाजप मात्र 150 पेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे.
BMC Election 2026 : मुंबईत भाजपकडून शिंदे गटाला फक्त 52 जागा?? आजच्या बैठकीत काय घडलं?

BMC Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मुंबई महापालिकेच्या निमित्ताने भाजप आणि शिंदे गट यांच्यातील बड्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे भाजप मात्र 150 पेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे.

बैठकीत नेमकं काय घडलं? BMC Election 2026

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अशावेळी जास्तीत जास्त जागा लढवून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि आपला महापौर बसवायचा असा भाजप आणि शिंदे गट या दोघांचाही प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या या बैठकीत भाजपने शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. भाजपकडून थेट आकडेवारी सांगत वार्डातील जागांची यादीच शिंदेंच्या शिवसेनेसमोर ठेवण्यात आली.

85 जागांचा तिढा कायम

त्यानुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या 52 जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. पण शिवसेनेची 125 जागांची मागणी आहे. याबाबत पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे. परंतु आजच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत 142 जागांता तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या बैठकीत शिवसेनेला 52 तर भाजपला 90 जागा देण्याचं ठरलं आहे. पण अद्यापही 85 जागांचा तिढा निकाली लागलेला नाही. BMC Election 2026

अजितदादा स्वतंत्र लढणार??

दरम्यान,  एकीकडे महायुतीतील भाजप आणि शिंदे गट मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित असताना महायुतीतील आणखी एक घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास भाजपचा विरोध आहे. अशावेळी शक्य झालं तर महायुतीत आणि शक्य नसेल तर महायुतीशिवाय मुंबईत कमीत कमी 50 जागा लढवण्याचा निर्धार अजित पवार गटांने केला असल्याचे बोलले जाते.