हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडताना अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. जेव्हा तुम्ही कोणतंही शुभ काम करण्यासाठी घरातून बाहेर पडतात. जसं की इंटरव्ह्यू देण्यासाठी, एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, लग्नाची बोलणी करण्यासाठी अशा कामांसाठी तुम्ही घरातून बाहेर पडताना कोणता पाय आधी टाकावा याबद्दल जाणून घेऊयात…
घरातून बाहेर पडताना कोणता पाय आधी पुढे टाकायचा?
घरातून बाहेर पडताना, विशेषतः सकाळी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी निघताना उजवा पाय आधी बाहेर ठेवणे शुभ मानले जाते. कारण ते यश आणि सकारात्मकता आणते, तर डावा पाय ठेवणे टाळले जाते. घरात प्रवेश करतानाही उजव्या पायानेच प्रवेश करावा, अशी परंपरा आहे.
शुभ मानले जाते
घरातून बाहेर पडताना उजवा पाय आधी बाहेर काढणे हे चांगले लक्षण मानले जाते. सकाळी किंवा शुभ कार्यासाठी (उदा. मुलाखत, नवीन व्यवसाय) निघताना उजवा पाय आधी बाहेर ठेवावा. यामुळे दिवस चांगला जातो आणि कामे यशस्वी होतात. उजव्या पायाला शुभ आणि सकारात्मक मानले जाते, ज्यामुळे कामात यश मिळते अशी श्रद्धा आहे. वडीलधारी मंडळी देखील हा सल्ला देतात, की शुभ कार्यासाठी किंवा महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना उजवा पाय आधी टाकावा. घरात प्रवेश करताना उजवा पाय आधी ठेवणे जसे शुभ मानले जाते, त्याचप्रमाणे बाहेर पडतानाही उजव्या पायाला प्राधान्य दिले जाते.
डावा पाय टाळा
डावा पाय आधी ठेवणे अशुभ मानले जाते आणि ते टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. डावा पाय टाकणे नकारात्मक परिणाम आणू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, पायांचा संबंध शनी ग्रहाशी असतो. त्यामुळे, योग्य पाऊल टाकल्याने कामात अडथळे येत नाहीत, असे म्हटले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





