हिंदू धर्मामध्ये अशा अनेक प्रथा सांगितल्या आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामधील सर्व अडथळे कमी होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रामध्ये दह्याला विशेष महत्त्व दिले जाते. कोणतेही शुभ कार्य, परीक्षा, नवीन नोकरी किंवा प्रवास सुरू करण्यापूर्वी दही आणि साखर खाण्याची परंपरा आहे. पण का याबद्दल जाणून घेऊयात…
शुभ मानले जाते
हिंदू धर्मात दही-साखर खाणे हे शुभ मानले जाते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. ही प्रथा शुभ मानली जाते आणि यामुळे कामात अडथळे येत नाहीत. हिंदू धर्मात दही-साखरेला पाच अमृत तत्वांपैकी एक मानले जाते, त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी ते खाणे फलदायी मानले जाते.
चंद्राची स्थिती
ज्योतिषशास्त्रानुसार, दही-साखर खाल्ल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक विचार येतात.
वैज्ञानिक कारणे
- दही आणि साखर यातून शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. तसेच, दही मेंदूला शांत ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करता येते आणि तणाव कमी होतो.
- साखरेमुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि दही शरीराला थंडावा देते, ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते.
- दही आणि साखर हे मिश्रण पचनासाठी चांगले असते आणि शरीराला ताजेतवाने ठेवते, ज्यामुळे कामाला चांगला आणि उत्साही प्रारंभ मिळतो. दही हे पचनासाठी चांगले असते, ज्यामुळे पोट व्यवस्थित राहते आणि अस्वस्थ वाटत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





