MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांना धक्का!! नमो शेतकरी योजनेतून लाखो नाव वगळली

Published:
नमो शेतकरी योजनेतून  लाखो शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याच्या बातम्या समोर आहेत. सरकार कडून करण्यात आलेल्या काटेकोर तपासणी आणि नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकरी या योजनेतून वगळले गेले आहेत.
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांना धक्का!! नमो शेतकरी योजनेतून लाखो नाव वगळली

Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रातील युती सरकारने केंद्र सरकारच्या धरतीवर राज्यात नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.  या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देण्यात येतात.  दोन हजार रुपयांच्या एकूण तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण ७ हप्ते शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले असून आता ८ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. मात्र याच दरम्यान शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेतून  लाखो शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याच्या बातम्या समोर आहेत. सरकार कडून करण्यात आलेल्या काटेकोर तपासणी आणि नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकरी या योजनेतून वगळले गेले आहेत.

पात्रतेबाबत कडक नियम (Namo Shetkari Yojana)

कृषी विभागाच्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनांमध्ये आता पात्रतेबाबत अधिक कडक भूमिका घेतली जात आहे. या धोरणामुळे अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्यादरम्यान सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना लाभ प्राप्त झाला होता. मात्र 21 व्या हप्त्यात हा आकडा घसरून 92 ते 93 लाखांवर पोहचला. म्हणजेच चार ते पाच लाख शेतकरी या आर्थिक मदतीपासून दूर राहिले. आता नमो किसान योजनेतुन (Namo Shetkari Yojana) सुद्धा हे शेतकरी बाद ठरण्याची शक्यता आहे.

कोणत्या कारणांनी शेतकऱ्यांना वगळले

शेतकऱ्यांना वगळण्याची कारणे वेगवेगळी आहेत . यामध्ये मृत लाभार्थी शेतकऱ्याची नावे अजूनही यादीत असल्याचे आढळल्याने सुमारे अशी 28 हजार नावे रद्द करण्यात आली. दुसरीकडे एकाच जमिनीच्या माध्यमातून दोन वेळा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने सुमारे 35 हजार लाभार्थी दुहेरी लाभामुळे अपात्र ठरले आहेत. तसेच रेशन कार्डच्या नव्या नियमांनुसार एका कुटुंबातून केवळ एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय लागू करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले आहेत. याशिवाय, ITR भरलेले शेतकरी किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरीही या नमो किसान सन्मान योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहेत.