MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

मोठी अपडेट; नवीन वर्षात रिचार्ज प्लॅन महागण्याची शक्यता; कारण नेमकं काय ?

Written by:Rohit Shinde
Published:
जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत जवळपास २० टक्के वाढ करू शकतात. म्हणजे जर तुम्ही २०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुम्हाला आता २४० रुपये मोजावे लागतील.
मोठी अपडेट; नवीन वर्षात रिचार्ज प्लॅन महागण्याची शक्यता; कारण नेमकं काय ?

तुमची डोकेदुखी वाढवणारी अशी बातमी खरंतर समोर येत आहे. नवीन वर्षात रिचार्जही महाग होण्याची शक्यता आहे. 2026 मध्ये टेलिकॉम टॅरिफ वाढवण्याची तयारी सुरू झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, 299 रुपयांचा प्लॅन 359 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. Airtel, Jio आणि व्होडाफोन आयडियाचे अनेक लोकप्रिय प्लॅन महाग होतील. कंपन्यांचे उत्पन्न वाढेल, परंतु ग्राहकांचा मासिक खर्चही वाढेल. त्यामुळे हा एक प्रकारचा फटका आहे. जाणून घ्या.

2026 मध्ये मोबाईल रिचार्ज प्लॅन महागणार ?

भारतातील टेलिकॉम कंपन्या आपल्या मोबाईल रिचार्ज प्लानच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. टेलिकॉम कंपन्या 2026 मध्ये रिचार्ज दर वाढवू शकतात. भारतीय खाजगी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया 2026 मध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड टॅरिफ 20 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. मागील टॅरिफ वाढीवरून असे दिसून येते की, भारतातील टेलिकॉम कंपन्या दर दोन वर्षांनी टॅरिफ वाढवत आहेत. शेवटची दरवाढ जुलै 2024 मध्ये शेवटची दरवाढ झाली असल्याने, ट्रेंडनुसार पुढील वाढ 2026 मध्ये होऊ शकते.

फायनान्शियल सर्व्हिसेसमधील प्रसिद्ध कंपनी मॉर्गन स्टॅनलीच्या मते, टेलिकॉम कंपन्या पुढील वर्षी 20% पर्यंत दरवाढ करू शकतात. टेलिकॉम कंपन्या चांगल्या किंवा जास्त किमतीच्या प्लानसह ओटीटी फायदे देऊन अप्रत्यक्षपणे दरवाढ करत आहेत आणि आता फक्त 2GB दररोज डेटा प्लानसह 5G बंडल करत आहेत. पुढील दरवाढीत, 5G नेटवर्कची सेवा आणखी महाग होऊ शकते. मॉर्गन स्टॅनलीच्या अॅनालिस्ट्सने सांगितले की, आम्ही आता 2026 मध्ये 4G / 5G प्लानमध्ये, प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्हीमध्ये सुमारे 16-20% दरवाढ गृहीत धरतो, ज्यामुळ आर्थिक वर्षात कंपन्यांसाठी ARPU मध्ये मोठी वाढ होईल.

रिचार्जच्या किंमतींमध्ये नेमकी किती वाढ होईल ?

रिसर्च फर्म मॉर्गन स्टॅनलीच्या रिपोर्टनुसार, भारतीय टेलिकॉम कंपन्या 2026 मध्ये त्यांच्या दरांमध्ये 16 ते 20 टक्क्यांनी वाढ करू शकतात. याचा उद्देश प्रति युजर्स सरासरी उत्पन्न म्हणजेच कंपन्यांचे ARPU वाढविणे हा आहे. गेल्या वेळी जुलै 2024 मध्ये दरवाढ झाली होती आणि आता दोन वर्षांनंतर किंमती पुन्हा वाढणार आहेत. हा टेलिकॉम सेक्टरचा फिक्स्ड पॅटर्न बनला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. एअरटेलचा 28 दिवसांचा अनलिमिटेड 5G प्लॅन 319 रुपयांवरून 419 रुपयांपर्यंत वाढू शकतो. त्याच वेळी, जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा मिळू शकतो. याशिवाय 349 रुपयांचा 28 दिवसांचा 5G प्लॅन 429 रुपयांपर्यंत वाढू शकतो. म्हणजेच युजर्सला दरमहा 80 ते 100 रुपये जास्त खर्च करावे लागू शकतात.