MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Weather Update: आता काही खरं नाही! 21 डिसेंबरला राज्यात कडाक्याची थंडी पडणार!

Written by:Rohit Shinde
Published:
थंडीची तीव्रता वाढली असून हुडहुडी भरली आहे. राज्यात थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
Weather Update: आता काही खरं नाही! 21 डिसेंबरला राज्यात कडाक्याची थंडी पडणार!

काही दिवसांपासून राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठा जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यभरातील तापमानात कमालीची घसरण झाल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवू लागली असून राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे. उद्या 21 डिसेंबर रोजी देखील राज्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

21 डिसेंबरला कडाक्याची थंडी पडणार ?

राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक ठिकाणी एक आकडी तापमानाची नोंद होत आहे. थंडीची तीव्रता वाढली असून हुडहुडी भरली आहे. राज्यात थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. थंडगार वारे वाहु लागल्याने राज्यात गारठा पसरला आहे. अनेक जिल्ह्यांत सकाळी उशिरापर्यंत धुके पहायला मिळत आहे. तर बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा खूपच खाली घसरला आहे. राज्यभरात थंडीचा कडाका असून हुडहुडी भरली आहे. थंडीची ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात तीन दिवस गारठा वाढणार आहे. उत्तर भारतातून पश्चिमी झंझावात प्रकोपामुळे थंड वारे महाराष्ट्रात वाहत आहेत. पुढील 48 तासांत महाराष्ट्र प्रदेशात कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल आणि त्यानंतर कोणताही मोठा बदल होणार नाही. तर किमान तापमानाचं बोलायचं झालं तर पुढील 7 दिवसांत तापमानात मोठा बदल होणार नाही. गुजरातमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्हे सर्वाधिक थंड ठरत असून जेऊर येथे 5 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही थंडी पुढील काही दिवस कायम राहणार असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !

सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.